घरमुंबई'हिंमत असेल तर अहमदाबाद चे कर्णावती करुन दाखवा', शिवसेनेचे भाजपला आव्हान

‘हिंमत असेल तर अहमदाबाद चे कर्णावती करुन दाखवा’, शिवसेनेचे भाजपला आव्हान

Subscribe

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल, असे सांगून हेमराज शाह म्हणाले की, ‘अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे? असा सवाल हेमराज शाह यांनी विचारला आहे.

‘मुख्यमंत्र्यांच्या बदनामीसाठीच हे सर्व’

‘महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे सरकार १९९५ साली सत्तारुढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले. परंतु काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाहीत. भाजपच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहीत असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत’, असा दावा देखील त्यांनी केला.

- Advertisement -

‘औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबाद चे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढण्यात याव्यात’, असे आवाहनही हेमराज शाह यांनी शिवसेनेच्या वतीने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -