घरमुंबईम्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनात दिसले नाही, संजय राऊतांचा खुलासा

म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनात दिसले नाही, संजय राऊतांचा खुलासा

Subscribe

महाराष्ट्रात सोमवारी शेतकऱ्यांचे नव्या कृषी विधेयकांविरोधात राज्यभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. पण आंदोलनाच्या दरम्यान कोणत्याही वेळी माहोल बिघडू दिला नाही. या शेतकरी मोर्चातही हजारो शेतकरी सहभागी झाले. पण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने असे हे आंदोलन झाले. शिवसेनेच्या सहभागाबद्दल यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री आंदोलनात सहभागी का झाले नाहीत, याबाबतचीही विचारणा करण्यात आली. पण सरकार चालवताना एक शिस्तीने चालवायचे असते. त्यामुळेच सरकारची शिस्त बिघडू नये म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेचाही खुलासा केला. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत याचा पुर्नउच्चार आज राऊत यांच्याकडून करण्यात आला.

आता जो बायडन यांचा राजीनामा मागणार का ?

शेतकऱ्यांचा संयम तुटत जो प्रकार घडला त्याची निंदा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आज मंगळवारी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराची जबाबदारी कोणत्याही एक पक्षाची नसून या प्रकारासाठी केंद्र सरकारही तितकेच जबाबदार आहे. म्हणूनच या प्रकरणात केंद्र सरकारने राजीनामा देण्याची गरज आहे. दिल्लीतल्या रस्त्यावर जो माहोल बिघडला आहे त्यासाठी केंद्र सरकारचा अहंकार जबाबदार आहे. आता कोणाचा राजीनाम मागणार असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला केंद्र सरकारला केला आहे. हे जर इतर कोणत्या राज्यात घडले असते तर त्याठिकाणी सरकारचा राजीनामा मागितला गेला असता. आता शरद पवारांकडून राजीनामा मागणार ? की ममता बॅनर्जी यांच्याकडून राजीनामा मागणार ? उद्धव ठाकरे यांच्याकडून राजीनामा मागणार ? की जो बायडन यांच्याकडून राजीनामा मागणार असा सवाल राऊत यांनी केला. आजच्या हिंसाचारामुळे शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध आंदोलनाला डाग लागला आहे. याची जबाबदारी ही केंद्र सरकारनेही घ्यावी असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

दुपारनंतर संपुर्ण विश्वास दिल्लीतल्या रस्त्यावर जे चित्र पाहिले ते आंदोलनकर्ते आणि सरकारला शोभा देत नाही. दोन महिन्यांपासून संयम आणि शांतीने आंदोलन सुरू होतेय. जगभरात या आंदोलनाची चर्चा होती. अशा प्रकारचे शिस्तबद्ध आंदोलन हे शेतकऱ्यांचे कधीच झाले नाही. पण आज अचानक आज काय झाले, संयम का सुटला ? दिल्ली लाल किल्ल्यावर , रस्त्यावर हिंसा अशी अराजकता का निर्माण झाली ? असा सवालही त्यांनी केला. सरकारच याच दिवसाची वाट पाहत होते का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवीन कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता सरकारची जबाबदारी ही उपाय काढण्याची होती. आज दिल्लीच्या रस्त्यावर अराजकता आहे. पंजाब अशांत आहे, माहोल भडकवणे हा कट असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -