घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीच्या ED विरोधी आंदोलनात शिवसेना नेत्यांची गैरहजरी, चर्चांना उधाण

महाविकास आघाडीच्या ED विरोधी आंदोलनात शिवसेना नेत्यांची गैरहजरी, चर्चांना उधाण

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलानालय (ईडी) मार्फत अटकेची कारवाई झाली आहे. सत्र न्यायालयाने मलिक यांना ८ दिवसांची ३ मार्चपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या मनमानी कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंत्रालयानजीकच्या गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे नेते सकाळपासूनच धरण आंदोलनाला बसले आहेत. पण या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रसचे नेते दिसत असले तरीही चर्चा आहे ती म्हणजे शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीची. शिवसेनेच्या बड्या नेत्यांची गैरहजेरीच या आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे. माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर अखेर शिवसेनेच्या काही नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावायला सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बड्या नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासारख्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली. पण शिवसेनेच्या नेत्यांची गैरहजेरी अनुपस्थितीचा विषय मात्र गाजला.

- Advertisement -

तासाभरानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे, आमदार सुनिल राऊत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई हे तासाभरानंतर आंदोलनाच्या ठिकाणी दिसले. शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामध्ये शिवसेनेचे बड्या नेत्यांची गैरहजेरी अधिक गाजत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवर सातत्याने प्रहार करणारे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत आंदोलनाच्या ठिकाणी दिसले नाहीत. तर राज्याचे परिवहन मंत्री आंगणेवाडी यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात आहेत. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असल्याचे कळते.

कार्यक्रम अचानक ठरल्याने ही अनुपस्थिती असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनिल राऊत यांनी दिली. शिवसेना नेत्यांमध्ये काही नेते हे कोकणात भराडी देवी यात्रेला गेले आहेत. तर आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत हे उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या निवडणुकांमुळे व्यस्त आहेत. काही नेते मणिपूरच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात आहे. या कार्यक्रमाची घोषणा ही अचानक झाल्याने शिवसेना नेत्यांची संख्या दिसत नाही. मुंबईतील शिवसेनेचे नेते दुपारपर्यंत हजर होतील, असेही सुनिल राऊत म्हणाले. कोणतेही प्रश्न उपस्थित करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडींने याठिकाणी नेते येण्यासाठी उपस्थित होण्यासाठी उशिर होत आहे, असेही कायंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

कॉंग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीवर कॉंग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे महाविकास आघाडीचे नेते याठिकाणी दिसतील. सर्व नेते नवाब मलिकांच्या मागे आहेत. त्यांच्याकडे गृहविभाग होता त्यावेळी कारवाई का झाली नाही ? असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला. त्यामुळे नवाब मलिकांच्या मागे सगळा देश उभा आहे असेही ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -