घरताज्या घडामोडीपक्षातील स्वयंभू नेत्यांकडून राजकीय खच्चीकरण - वामन म्हात्रे

पक्षातील स्वयंभू नेत्यांकडून राजकीय खच्चीकरण – वामन म्हात्रे

Subscribe

स्थायी समितीची निवडणूक भाजप प्रतिष्ठेची करणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना एका गोपनीय पत्राद्वारे दिली होती. पक्षातील काही स्वयंभू नेत्यांनी गेल्या दहा वर्षात मला राजकारणातून संपवण्याचे डावपेच खेळून माझे राजकीय खच्चीकरण करीत असल्याची व्यथा म्हात्रे यांनी पत्रात मांडली आहे. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उजेडात आली असून, त्यातूनच सेनेला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या दहा वर्षात मला राजकारणातून संपवण्याचे डावपेच

स्थायी समितीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे हे अनुपस्थित असल्याने शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र म्हात्रे हे आजारपणामुळे रूग्णालयात असल्याने निवडणुकीला उपस्थित राहू शकलेले नसल्याचे जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. २०१० पासून कोणतेही पद मिळालेले नसल्याने म्हात्रे यांनी शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात सभापतीपदासाठी इच्छूकता दर्शविली होती. पक्षातील काही स्वयंभू नेत्यांनी गेल्या दहा वर्षात मला राजकारणातून संपवण्याचे डावपेच खेळून माझे राजकीय खच्चीकरण करीत आहेत. मागील निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांनी भावजय कविता म्हात्रे यांचा पराभव केला, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे. सन २००७ ते २०१० यावेळी काँग्रेसचे नारायण राणे व गणेश नाईक, पप्पू कलानी यांच्या करोडो रुपयांच्या ऑफर धुडकावून शिवसेनेची सत्ता आणली. तसेच दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ च्या बैठकीतनंतर गणेश कोट यांचे पुढील सभापती म्हणून एका पदाधिकारी याने नाव जाहीर केले हे पक्ष शिस्तीला धरून नाही. मी पक्षासाठी काम करणारा व आपला आदेश पाळणारा एक शिवसैनिक आहे. माझ्या कडून काही कळत नकळत चूक झाली असल्यास मला क्षमा करावी. प्रत्यक्ष भेट घेऊन माझी बाजू मांडणार आहे असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांच्या मनसेकडे पायघडया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -