घरमुंबईCorona: यंदा शिवतीर्थावरील शिवसेनेच्या मेळाव्याची परंपरा खंडित! तर 'या' ठिकाणी होणार मेळावा

Corona: यंदा शिवतीर्थावरील शिवसेनेच्या मेळाव्याची परंपरा खंडित! तर ‘या’ ठिकाणी होणार मेळावा

Subscribe

ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेली असताना, शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा विशेष महत्त्वाचा..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थावर न होता तो समोरच असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार घेतला जाणार आहे. खरंतर ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेली असताना, शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा महत्त्वाचा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

त्यामुळे यंदा होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील सोहळ्यात जाहीर सभा न होता तो एका सभागृहात निवडक १०० मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांची भाषणं समाजमाध्यमांवरून राज्यभरातील शिवसैनिकांसाठी थेट प्रक्षेपित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यंदाचा पहिलाच दसरा मेळावा आहे. हा दसरा मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन शिवसेना नेत्यांचे होते. मात्र, कोरोनामुळे आता ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडीच्या सरकारचाही हा पहिलाच दसरा आहे. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या सोहळा देखील साधेपणाने करण्यात येईल असे चिन्ह दिसताय..

आतापर्यंत दोनदा मेळावा रद्द

इतिहासात दोन वेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. पहिल्यांदा २००६ मध्ये प्रचंड पाऊस आल्यामुळे आणि दुसरा २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मेळावा पुढे ढकलला होता. देशात व राज्यात कोरोनाचे संकट उभेच आहे. अनेक सण-उत्सव कोरोनामुळे रद्द करावे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमू नये यासाठी शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मेळावा साजरा केला जाणार आहे.

- Advertisement -

 

हेही वाचा – शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईनच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -