घरमुंबईखोट बोलून आपली प्रतिमा वाईट करू नका, किशोरी पेडणेकरांचा फडणवीसांना सल्ला

खोट बोलून आपली प्रतिमा वाईट करू नका, किशोरी पेडणेकरांचा फडणवीसांना सल्ला

Subscribe

“बाबरी मशीदीवर शिवसैनिक हल्लासाठी चढले त्यांचे बाळासाहेबांनी कौतुक केले, तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा होते. तेव्हा का गप्प होते त्याचं उत्तर द्या. तुम्हा आम्हाला विचारता कुठे होते म्हणून.. तुम्ही कुठे होते. मी आहे मी होतो म्हणून नाही चालतं… असा पलटवार शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी फडणवीसांवर  केले. यावर त्या पुढे म्हणाल्या की,  “ज्या बह्हादुर शिवसैनिक गेले त्यांचे रेकॉर्ड काढा, फोटो काढा आणि बघा, तुम्हाला लोकं काय उद्या विसरले असं वाटतात का? असं नाही आहे. हा प्रत्येकाच्या धर्माचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे उगाचंच तुम्ही खूप वरिष्ठ आहे. तुमचं चांगलं राजकीय कामकाज आहे पण त्यात असं काही तरी खोट बोलून आपली प्रतिमा वाईट करू नका.”, असा सल्ला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल बाबरी मशिदीवरून केलेल्या वक्तव्याचा पेडणेकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “बाबरी मशीदचा खुमट पाडल्यानंतर जी पळा भुई थोडी झाली त्या पळता भुई थोडीमध्ये कोणीच जबाबदारी घेत नव्हते. ती जबाबदारी घेतल्यामुळे थोडा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. सगळे मागचे रेकॉर्ड मिळतील. त्यावेळी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: सांगितलं बाबरीचं वरचं खुमट माझ्या शिवसैनिकांनी पाडले. तेव्हा का नाही तुमची तोंड उघडली.” अशी टीका पेडणेकरांनी केली आहे.

- Advertisement -

पेडणेकर पुढे म्हणाल्या की, “उत्तरप्रदेशचे सगळे मागचे रिपोर्ट तपासले पाहिजेत. त्यावेळी आम्ही स्वत: कल्याणपर्यंत गेलो मात्र महिलांना येऊ नका असं सांगून गाडीतून बाहेर काढले. आम्ही २७ जणी होतो. आम्ही पोहचू नाही शकलो म्हणून आम्ही मोठेपणा सांगणार नाही आम्ही होतो म्हणून. नव्हतो तर नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे रेकॉर्ड बदलण्याचे काम करताय, मागचे मागचे इतिहास बदलून सांगण्याचे काम करताय, लोकं तुम्हाला वेडी वाटली का? लोकांना कळतं यातील सुपारी बहाद्दुर कोण आहेत, सत्तेसाठी काय पण करेन, लोकांचे जीव गेले तरी चालतील पण मी करेन, असे कोण आहेत हे सर्वांना कळतंय.”

“भाजपवाले जेलमध्ये गेले पण असतील, पण तुमच्या आजूबाजूला शिवसेनेचेही लोकं होते हे विसरु नका, असे कसे स्वप्न दोष व्हायला लागले, अशी कशी विचित्र स्वप्न पडू लागली. नरजेचा दोष, स्वप्न दोष, असं काय होतयं का?” असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.

- Advertisement -

“भाजपने कितीही गेम करा, शिवसेनेला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा. बाबरी पाडायला तुम्ही असालही मात्र शिवसेनेचेही नेते होते. त्यामुळे धनुष्यधारी शिवसेना बदलण्याची गरज नाही, असा सल्लाही पेडणेकर यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच आमचे हिंदुत्व सगळीकडे दिसतं तुमच्या प्रश्नांनी काही होणार नाही. मात्र काहींना यातही केमिकल लोच्या झाल्याचे दिसते आहे,” असं म्हणत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे.


भोंग्यासंदर्भातील निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा नाही- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -