घरताज्या घडामोडीशिवसैनीकांनी लावलं आशिष शेलारांचं वादग्रस्त होर्डिंग!

शिवसैनीकांनी लावलं आशिष शेलारांचं वादग्रस्त होर्डिंग!

Subscribe

मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले आहेत. भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आलेत. हे होर्डिंग लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेमध्ये टीका करणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. या आधी मंगळवारी डोंबिवलीत शिवसेनेतर्फे ‘जोडेमारो’ आंदोलन करण्यात आले होते.

होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आलेत. तसेच “आ’शिषे’ मे देख” अशी वाक्य लिहण्यात आली आहेत. आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मंबईत अनेक ठिकाणी आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने केली आणि होर्डिंगही लावलेत.

- Advertisement -

आशिष शेलार म्हणालेले

सीएए अर्थात नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बोलताना नालासोपाऱ्यात बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, ‘आज मी टीव्हीवर बघितलं की शिवसेनेने सीएएविषयी आपली भूमिका बदलली आहे. सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, तुझ्या बापाचं राज्य आहे का? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं ओपिनियन घ्या. अभ्यास करता येत नसेल, तर माझ्यासारखे वकील खूप आहेत.’

रंगलं ट्विटरवॉर

आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली. ‘उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. होय, मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाहीत’, असं आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

माफी मागायला अडचण नाही…

दरम्यान, या आरोपांनंतर आशिष शेलार यांनी सारवासारव करत भूमिका स्पष्ट केली. ‘माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाला असंवैधानिक वाटत असेल, त्रास झाला असेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला, माफी मागायला माझी काहीही अडचण नाही. पण माझा रोख हा शिवसेनेसाठी नव्हता. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची सीएएविषयीची भूमिकाच अजून जाहीर केलेली नाही. माझ्या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दिशेने होता’, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. त्याशिवाय आशिष शेलार यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून टीका करण्यासाठी ट्वीट देखील केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -