घरताज्या घडामोडीपश्चिम बंगाल निवडणूकीत कोणाला शिखंडी केले जातय ? - संजय राऊत

पश्चिम बंगाल निवडणूकीत कोणाला शिखंडी केले जातय ? – संजय राऊत

Subscribe

दिल्लीतल्या नेत्यांना एक, ममता दीदींना वेगळा न्याय का ? राऊतांचा सवाल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापुढच्या वर्षातील गुढी ही आरोग्यदायी वातावरणात उभी करू अशा शब्दात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यदायी अशा वातावरणात पुढच्या वर्षात गुढी उभारतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पश्चिम बंगाल येथे सुरू असलेल्या निवडणुकांदरम्यान ममता बॅनर्जी यांना प्रचार करण्यासाठी घातलेल्या २४ तासांच्या बंदीवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारासाठी घातलेली बंदी म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याचे मत राऊत यांनी मांडले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये माहोल बनवला आहे. तरीही ममता बॅनर्जी यांनाच यश मिळणार असे राऊत म्हणाले. कारण ममता बॅनर्जी यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये सध्या महाभारतातले युद्ध सुरू आहे. पण या युद्धाचे कोणतेही नियम नाहीत. या महाभारतातही कोणाला शिखंडी बनवून युद्ध जिंकण्यात येत आहे हेदेखील तपासण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे दिल्लीतील नेते येतात, त्यांच्यासाठी निवडणुक आयोगाचा वेगळा न्याय आणि ममता दीदींसाठी वेगळा न्याय आहे का ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. फक्त ममता दीदींवरच निवडणूक आयोगा कारवाई कशी काय करू शकते ? असाही सवाल राऊत यांनी यावेळी केला. आदर्श आचारसंहिता ही सर्वांसाठी सारखीच आहे. भाजपचे जे मोठे नेते भाषण करत आहेत, त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही का असाही सवाल राऊत यांनी केला. ममता दीदींवर आणलेली बंदी म्हणजे लोकशाही आणि निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी असल्याचे राऊत म्हणाले.

- Advertisement -

फडणवीसांना शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कधी राज्य आणायचे अशी घोषणा केली असेल, तर त्या घोषणेसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय पक्ष म्हणून आमच्यात मतभेद असले तरीही राजकारणात कोणीही शत्रू नसतो. त्यामुळेच फडणवीस यांनी तर कोणती तारीख सरकार पाडण्यासाठी निश्चित केली असेल, तर त्या तारखेला आमच्या शुभेच्छा आहेत, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकीय लढाई वेगळी आहे, निवडणुकीत आम्ही ती लढाई जिंकूच. फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत असेही राऊत यावेळी म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -