घरमुंबईसंजय राऊत यांच्यावर होणार अँजिओप्लास्टी; लिलावतीत दाखल

संजय राऊत यांच्यावर होणार अँजिओप्लास्टी; लिलावतीत दाखल

Subscribe

वर्षभरापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती

शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी मुंबईमधील लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. तर संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने उद्या त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान वर्षभरापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंरतु त्यांचा त्रास वाढू लागल्याने पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्यावर उद्या लिलावती रुग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ मॅथ्यू हे राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहेत. संजय राऊत यांच्यावर उद्या लिलावती रुग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ मॅथ्यू हे राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळी संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल होतील तर उद्या दुपारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

- Advertisement -
राऊतांचा योगींंवर निशाणा

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच चर्चेत आहे. युपीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी एक हजार एकर जागेत फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केल्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. योगीजींना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक फिल्मसीट उभारावी आणि ती चालवून दाखवावी, असे संजय राऊत म्हणाले.


योगींनी फिल्मसिटी उभी करावी आणि चालवून दाखवावी – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -