संजय राऊत डॉक्टरांची नाही तर सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागा

shivsena mp Sanjay Raut

गेल्या काही काळामध्ये विशेषत: ग्रामीण, आदिवासी आणि झोपडपट्टी भागांमध्ये कंपाउंडर म्हणजेच बोगस डॉक्टरांचे फावल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची मोठी हानी होत होती आणि त्याविरुद्ध विविध सामाजिक संघटना, सरकारचे सल्लागार, डॉक्टरांच्या संघटना वेळोवेळी या बोगस डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या मागण्या करत आल्या आहेत. सरकार आणि प्रशासन सुद्धा वेळोवेळी या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करत असते.

खासदार संजय राऊत यांचे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे असून डॉक्टरांच्या केवळ कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे नसून कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळामध्ये मनोबलावर विपरीत परिणाम करणारे आहे. परंतु सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणून भोळीभाबडी जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांचे आरोग्य बोगस डॉक्टरांच्या हातात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण होत आहे याची जाणीव ठेवून लोकांमधील संभ्रम आणि गैरसमज दूर व्हावे करिता राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागो न मागो परंतु सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागून त्यांच्या मनात पेरलेले गैरसमज तात्काळ दूर करावे, असे केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ दीपक मुंढे म्हणाले.


हेही वाचा – मी बोलण्याच्या ओघात डॉक्टरांवर कोटी केली, त्याचं कौतुक व्हायला हवं – संजय राऊत