घरताज्या घडामोडी'राम मंदिर हा न्याय आणि सत्याचा विजय; ओवेसी आता रडणे बंद करा'

‘राम मंदिर हा न्याय आणि सत्याचा विजय; ओवेसी आता रडणे बंद करा’

Subscribe

राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा, न्यायाचा आणि सत्याचा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असुद्दीन ओवेसी यांनी रडणे बंद करावे', असा सल्ला शिवसेनेने ओवेसी यांना दिला आहे.

‘राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा, न्यायाचा आणि सत्याचा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असुद्दीन ओवेसी यांनी रडणे बंद करावे’, असा सल्ला शिवसेनेने ओवेसी यांना दिला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. त्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हणाले असुद्द्दीन ओवेसी?

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. असदुद्दीन ओवेसी म्हणतात, ‘अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी ४५० वर्षे एक मशीद उभी होती.’ यावर शिवसेनेचे म्हणणे आहे की, ‘ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे, कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले आणि तेथे मशीद उभी केली गेली होती. त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? ज्यांनी पाप तोफांनी उभे केले की, पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे लोकभावनेचा हा विजयच आहे, मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा’,असे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisement -

शिवसेना म्हणते कोण हा बाबर?

ओवेसी म्हणतात की, ‘बाबर जिवंत आहे. पण, आम्ही त्यांना प्रश्न विचारतो कोण आहे हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो? आता तर बाबरीचे नामोनिशाणही मिटले आणि भूमिपूजन सोहळ्यामुळे अयोध्येतील सुतकही गेले. बाबर आता भारतातच काय, तर जगात कोठेच जिवंत नाही. ज्या उझबेकिस्तान नामक प्रांतातून तो आला त्या देशात तरी तो किती जिवंत आहे. याचे भान ओवेसींसारख्या उच्चशिक्षित मुसलमान पुढाऱ्यांनी ठेवले पाहिजे’.

‘मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले. पण, म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला आणि तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत?’

- Advertisement -

ओवेसी म्हणतात, ‘मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते’.


हेही वाचा – पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना BMC ने केले क्वॉरंटाईनमुक्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -