घरताज्या घडामोडीमुंबई विमानतळावरील अदानी नामफलकाची शिवसैनिकांकडून तोडफोड

मुंबई विमानतळावरील अदानी नामफलकाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Subscribe

मुंबई विमानतळावरील अदानी यांच्या नावाच्या फलकाची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. अदानी समुहाला १३ जुलैला मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट असा नामफलक लावण्यात आला होता. याचं नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सध्या व्हायरल होत आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अदानी एअरपोर्ट असे फलक अनेक भागात लावण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर देखील अदानी एअरपोर्ट असा नामफलक लावण्यात आला आहे. मात्र आज त्या नामफलकाची भारतीय कामगार सेनेकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणाकरून तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नामफलकावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर आता भारतीय कामगार सेना यामुद्द्यावर आक्रमक झाल्याची दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई विमानतळावर पोलीस दाखल झाले आणि त्यांना सर्व शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

यावर घटनेवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, ‘मुंबई विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे, असं अदानी यांना कळवण्यात आलं होत. तरी अदानी एअरपोर्ट म्हणून लिहिता. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर देखील अदानी एअरपोर्ट लिहिलं आहे. छत्रपती शिवाज महाराज यांचं नावं त्यांच्या टी-शर्टवर दुर्बिणीतून दिसेल असे लिहिण्यात आलं आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. काही वेळेला सांगून दुर्लक्ष केलं जातं, मग अशाप्रकारची प्रतिक्रिया उमटते. यापूर्वी GVKने GVK एअरपोर्ट म्हणून नामफलक लावला होता का?. भारतीय कामगार सेनेने हे चांगलं काम केलं आहे. सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे.’

याबाबत अदानी कंपनीकडून आलेली प्रतिक्रिया

“छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) येथे अदानी विमानतळांच्या ब्रँडिंगच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बाबतीत, आम्ही ठामपणे आश्वासन देतो की, अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) ने फक्त पूर्वीच्या कंपनीच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) मधील ब्रँडिंग हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे. तसेच अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राहील”, असे एएएचएलच्या प्रवक्त्याने सांगितले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -