घरमुंबई'क्या यहीं अच्छे दिन है?', सेनेची केंद्र सरकारविरोधात जोरदार पोस्टरबाजी

‘क्या यहीं अच्छे दिन है?’, सेनेची केंद्र सरकारविरोधात जोरदार पोस्टरबाजी

Subscribe

देशभरासह राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे तर काही ठिकाणी गाठण्याच्या तयारीत आहे. इंधनदरवाढी विरोधात सर्वसामान्यांचे हाल होत असून देशभरातून इंधनदरवाढी विरोधात आंदोलनं केली जात आहे. मात्र मुंबई सारख्या शहरातून देखील वाढत्या इंधन दराविरोधात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असल्याची चर्चा सुरूये. हे पोस्टर वांद्रे पश्चिम भागात लावल्याचे सांगितले जात आहे.

वाढत्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्यात आले.

- Advertisement -

असे आहेत पोस्टर्स

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात २०१५ साल आणि २०२१ मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात २०१५ साल आणि २०२१ सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचं म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीसह या दरवाढीचा फटका सामान्यांना बसत असल्याने केंद्र सरकारवर नागरिक चांगलेच नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -