घरताज्या घडामोडीशिवसेना स्टाईलने राडा घालणाऱ्या युवा सैनिकांना मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

शिवसेना स्टाईलने राडा घालणाऱ्या युवा सैनिकांना मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

Subscribe

शिवसैनिक व युवा सैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केले असून त्यांना शाबासकी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबदद्ल आक्षेपार्ह टीप्पणी केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राणे पिता पुत्रांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आज शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. ज्या जोशात शिवसैनिक व युवा सेनेने राणेंचा समाचार घेतला ते बघून अनेकांना जुनी आक्रमक शिवसेना आठवली. या शिवसैनिक व युवा सैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केले असून त्यांना शाबासकी दिली आहे.

राणे  यांनी अटक टाळण्यासाठी अनेक खटाटोप केले होते. त्याचा बचाव करण्यासाठी भाजपचे बडे नेतेही समोर आले . पण तरीही राणे यांना दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. काहीजणांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. भारतमाता आणि कुलाबा येथे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडले. त्याआधी सकाळपासून शिवसैनिक व युवा सैनिकांनी राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केली होती. यावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी घोषणाबाजी करत जुहू परिसर दणाणून सोडला होता. शिवसैनिकांची गर्दी पाहता कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जुहू परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण यावेळी पोलिसांचे म्हणणे ऐकण्य्याच्या मनस्थितीत शिवसैनिक व युवा सैनिक नव्हते. यामुळे पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला. या घटनेचे राज्यातच नाही तर दिल्लीतही पडसाद उमटले. नारायण राणेंच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरही शिवसेना दिल्ली प्रदेश कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यामुळे शिवसैनिक व युवा सैनिकांचे मनोबल अधिकच उंचावले असून राणे विरु्दध शिवसेना हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -