घरमुंबईशिवसेनेचे आमदार १० कोटींच्या प्रतिक्षेत

शिवसेनेचे आमदार १० कोटींच्या प्रतिक्षेत

Subscribe

सेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी १० कोटी रुपये विकासनिधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून आश्वासनाची पूर्तता झाली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करण्याची मागणी सेनेच्या आमदारांनी प्रतोदांकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत केली.

मुख्यमंत्र्यांकडून सतत सावत्र वागणूक दिली जात असल्याने शिवसेनेचे आमदार भलतेच संतापले आहेत. त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. सेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी १० कोटी रुपये विकासनिधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून आश्वासनाची पूर्तता झाली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करण्याची मागणी सेनेच्या आमदारांनी प्रतोदांकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत केली. त्यानुसार सेनेचे आमदार मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडकले, परंतु मुख्यमंत्र्यांनी भेटच दिली नाही. परिणामी संतप्त झालेल्या सेनेच्या आमदारांनी आता हिसका दाखवण्याची वेळ आली आहे, या अधिवेशनात आम्हाला गृहित धरू नका, असा सज्जड इशाराच दिला आहे.

आम्ही सावत्र आहोत का ? आमदार आक्रमक

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले तेव्हा सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केवळ भाजप आमदारांना निधी दिला जात असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्हालाही १० कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाईल’, असे जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सपशेल फसवले, म्हणून एका संतप्त आमदाराने ‘आम्ही काय सावत्र आहोत काय’, असा सवाल सेनेच्या मंत्र्यांना केला. विधानसभेचे तालिका अध्यक्ष असलेले शंभूराजे देसाई यांनी तर ‘हे (मुख्यमंत्री) तुपात आहेत, आपल्याला ते खेळवतात’, असे म्हटले. ‘त्यांना हिसका दाखवण्याची वेळ आली आहे’, असे प्रतोद यांनी बोलावलेल्या बैठकीत म्हणाले.

- Advertisement -

मंत्री एकनाथ शिंदेवरही रोष

आमदारांचा रोष पाहून ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी हे पैसे दिल्याची माहिती दिली. शिंदे यांच्या माहितीने तर शंभूराजे देसाई, अजय चौधरी, सुनिल शिंदे, मनोहर भोईर चांगलेच संतप्त झाले. कोणी सांगितले आम्हाला निधी दिला? अशी विचारणा या आमदारांनी केली. स्टेट हायवेला दिलेला निधी आमचा कसा, अशी विचारणा शंभूराजे यांनी केली. गेल्या चार वर्षात आमच्या तोंडाला पाने पुसली गेली. २५/१५च्या फंडातून एक पैसाही मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासने दिली, असे शरद साबणे म्हणाले. मुख्यमंत्री असेच वागणार असतील तर त्यांना येणार्‍या विधान परिषद निवडणुकीची आठवण करून द्या, असे सांगण्यात आले. आमदारांचा हा रोष पाहून मुख्यमंत्र्यांकडेच याची विचारणा करा, असा आग्रह आमदारांनी धरला. तेव्हा मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. मात्र मुख्यमंत्री बैठकीत असल्याचे सांगत त्यांना परतवण्यात आले.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -