Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! शिक्षणासाठी हैदराबादहून मुंबईत आललेल्या विद्यार्थ्याची आयआयटीमध्ये आत्महत्या

धक्कादायक! शिक्षणासाठी हैदराबादहून मुंबईत आललेल्या विद्यार्थ्याची आयआयटीमध्ये आत्महत्या

Subscribe

Student Commits Suicide | दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. त्यावेळी परिसरातील कर्मचाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत दर्शनला पाहिले.

Student Commits Suicide | मुंबई – शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या हैदराबादच्या मुलाने पवईच्या आयआयटीमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर्शन सोलंकी (१९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची शनिवारीच परीक्षा संपली होती. त्यानंतर, रविवारी त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

दर्शन आयआयटीमध्ये बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो १६ नंबर वसतिगृहाच्या ८०२ क्रमांक खोलीत राहत होता. तीन महिन्यांपूर्वीच तो हैदराबादरहून मुंबईत आला होता. शनिवारी परीक्षा संपल्यानंतर रविवारी त्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली. त्यावेळी परिसरातील कर्मचाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत दर्शनला पाहिले.

- Advertisement -

हेही वाचा – बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

दर्शनला तात्काळ आयआयटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

दर्शनने आत्महत्या का केली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, आपल्या मृत्यूप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. वसतिगृहाच्या खोलीतील फलकावर त्याने ही सुसाईड नोट लिहिली होती. दरम्यान, याप्रकरणी, पवई पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, सहा माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

- Advertisment -