घरताज्या घडामोडीपोलीस असल्याची बतावणी करून दुकानदाराला लुटले

पोलीस असल्याची बतावणी करून दुकानदाराला लुटले

Subscribe
दोन बनावट पोलीस आणि एका बनावट ग्राहकाने किराण दुकानदाराला बोलण्यात गुंतवून त्याचे ५४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर – ५ येथील साई कृपा चाळ या ठिकाणी राहणाऱ्या अरुण भानुदास साळुंखे (६४) यांचे स्वामी शांतीप्रकाश योगा केंद्राजवळ किराणा दुकान आहे. काल दुपारी १ वाजताच्या सुमारास ते दुकानात बसले असतांना दोन अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आले. त्यांनी साळुंखे यांना आम्ही दोघे पोलीस असल्याचे सांगितलेय इतक्यात एक बनावट गिऱ्हाईक दुकानात आला आणि तुम्ही गुटखा आणि तंबाखू विकता का? असे विचारले इतक्यात दोन बनावट पोलिसांनी तुमच्या दुकानात गुटखा आणि तंबाखू असेल तर आम्हाला पंचनामा करावा लागेल असे सांगून पंचनामा सुरू केला, यावेळी साळुंखे यांना त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असा ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने बाजूला काढून ठेवण्यास सांगितले. साळुंखे यांनी एका कागदाच्या पुडीत हे दागिने बांधले आणि ते ड्रॉवर मध्ये ठेवले. याआधी साळुंखे यांच्या नकळत बनावट पोलिसांनी तशीच पुडी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. नंतर हातचलाखीने सोन्याचे दागिने असलेली पुडी काढून घेतली. जाताना पंचनामा करायचा आहे पोलीस ठाण्यात या असे सांगून साळुंखे यांच्या कानाखाली चापट मारली.

साळुंखे हे स्वतःला सावरण्याच्या आधीच तिघेही आरोपी तेथून फरार झाले. दरम्यान साळुंखे यांनी ड्रॉवर मधील पुडी तपासली असता त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. हिल लाईन पोलीस ठाण्यात पंचनाम्याची बाब सांगितली असता अशा प्रकारचा पंचनामा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे साळुंखे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात तीन अज्ञात इसमांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -