घरCORONA UPDATEरेमडेसिवीरसाठी अजूनही वणवण सुरुच - महापौर किशोरी पेडणेकर

रेमडेसिवीरसाठी अजूनही वणवण सुरुच – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट असून अजूनही रेमडेसिवीरसाठी वणवण सुरुच आहे.

“सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक राजकारण करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शनकरता अजूनही वणवण सुरु असताना विरोधक अशात राजकारण करताना दिसत आहे. राज्यातील जास्तीत जास्त परिस्थिती कशी बिकट होईल याकडे विरोधकांचे लक्ष आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करणे तात्काळ थांबवावे”, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

विरोधक राजकारण करण्यात व्यस्त

“राज्यातील विरोधक राजकारण करताना दिसत आहे. एकीकडे रेमडेसिवीर साठा कमी पडत असताना दुसरीकडे ज्या व्यक्तीकडे रेमडेसिवीरचा साठा आढळून आला त्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेतले. ही बाब कळताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना घेऊन रात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानक गाठत त्याला व्यक्तीला सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, यावरुन विरोधक राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे”.

- Advertisement -

पालिकेच्या रुग्णालयात रेमडेसिवीर तुटवडा होऊ देणार नाही

“सध्याच्या परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनकरता वणवण करावी लागत आहे. मात्र, आता मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत असून आता महापालिकेच्या रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा होऊ देणार नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला होता. मात्र, ज्याठिकाणी ऑक्सिजनचा साठा होता त्याठिकाणी आपण रुग्णांना पाठवले होते. मात्र, आता असे देखील दिसून येते की, बऱ्या झालेल्या रुग्णांचा अचानक ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. पण, आता मुंबई महापालिकेने बेड वाढवले आहेत. त्यामुळे आता ही देखील चिंता मिटण्याची शक्यता आहे”.


हेही वाचा – पात्र नसताना पुतण्याने लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -