श्रद्धा वालकरचे नवे चॅट्स आले समोर, रुग्णालयात दाखल झाल्याचा उल्लेख

shraddha walker murder case new chat revels shraddha walkar was admitted in hospital

श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. अशात श्रद्धाचे आणखी एक चॅट समोर आले आहे. ज्यात तिने हॉस्पीटलमध्ये अॅडमिट झाल्याचा उल्लेख केला आहे. यासोबत काही कागदपत्रं पाठवल्याचा उल्लेखही आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात श्रद्धाच्या फोनचा शोध सुरु आहे. पोलीस आज पुन्हा भाईंदर खाडीत जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाचा मोबाईल महाराष्ट्रातच फेकून दिला आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांचे पथक भाईंदरच्या खाडीत संयुक्तपणे शोध मोहीम राबवणार आहेत. याशिवाय आज पुन्हा आफताबची पॉलीग्राफ टेस्ट घेण्यात येणार आहे. गुरुवारी टेस्टदरम्यान आफताबला अनेक वेळा शिंका आल्याने विचारलेल्या प्रश्नांचे रेकॉर्डिंग नीट करता आले नाही. त्यामुळेच आज आफताबला पुन्हा पॉलीग्राफ टेस्टसाठी बोलावण्यात आले आहे. गुरुवारी आफताबची दिल्लीच्या एफएसएलमध्ये 9.30 तास पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.

श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताबविरोधात दिल्ली पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. पोलिसांनी 5 चाकू जप्त केले आहेत, ज्याचा वापर करून आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. हे पाच चाकू सामान्यतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या चाकूंपेक्षा मोठे आणि जास्त धारदार आहेत. मात्र त्याच्याकडे हे चाकू कुठून आले याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

निर्दयी खुनी आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाच्या मृतदेहाचे केवळ 35 तुकडेच केले नाहीत तर त्याने प्रेम या नात्याचेही तुकडे केले आहेत. आरोपी आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने करवत आणि मोठ्या चाकूचा वापर केला होता. चौकशीत आफताबने श्रद्धाचा मृतदेह ज्या करवतीने कापल्याची कबुली दिली, त्या करवतीचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. आफताबने करवत कुठे लपवली किंवा फेकली याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत.


अमृता फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण; म्हणाल्या, मराठी बोलण्याच्या ओघात…