घरदेश-विदेशटाटा ट्रस्टमध्ये मोठा बदल! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ

टाटा ट्रस्टमध्ये मोठा बदल! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ

Subscribe

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा ट्रस्टमध्ये मोठा बदल झाला आहे. सिद्धार्थ शर्मा यांची टाटा ट्रस्टच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अपर्णा उप्पलुरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) पदी वर्णी लागली आहे. ही नियुक्ती 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. टाटा ट्रस्टच्या वतीने याबाबत एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.

एन श्रीनाथ गेल्या वर्षी निवृत्तीनंतर सीईओ पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे आता सिद्धार्थ शर्मा आता त्यांची जगा घेतली. 54 वर्षीय सिद्धार्थ शर्मा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सरकारी सेवेत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये महत्त्वाची पद सांभाळली. यासह देशाच्या 13 व्या आणि 14 व्या राष्ट्रपतींचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले. यानंतर ते टाटा समूहात सामील झाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान फोर्ड फाऊंडेशननंतर अपर्णा उप्पलुरी आता टाटा ट्रस्टचा भाग होणार आहेत. त्यांची टाटा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 48 वर्षीय अपर्णा सध्या फोर्ड फाऊंडेशनच्या भारत, नेपाळ आणि श्रीलंकेसाठी कार्यक्रम संचालक म्हणून काम पाहत होत्या. अपर्णा उप्पलुरी या परोपकार, महिला हक्क, सार्वजनिक आरोग्य, कला आणि संस्कृती या क्षेत्रात धोरणात्मक नियोजन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी फोर्ड फाऊंडेशनमध्ये लैंगिक न्यायासाठी मोठ्या प्रमाणात काम केल आहे.

टाटा समूहाच्या समूह कंपन्यांची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे. कुपोषण, कर्करोगावरील उपचार, स्वच्छता आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात टाटा ट्रस्टने काम करावे ही रतन टाटा यांची इच्छा आहे. ट्रस्टने नेतृत्व करण्यासाठी निवडलेल्या लोकांकडे अशा क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव आहे.


कंगना रनौतची ट्विटरवर पुन्हा टिवटिव सुरू; चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -