घरताज्या घडामोडीआता शिवभोजन थाळीला सिद्धिविनायक न्यासाचीही मदत

आता शिवभोजन थाळीला सिद्धिविनायक न्यासाचीही मदत

Subscribe

ठाकरे सरकारच्या महत्वाकाशी अशा शिवभोजन थाळीला आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने मदत दिली असून, या योजनेसाठी ५ कोटींची मदत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ठाकरे सरकारच्या महत्वाकाशी अशा शिवभोजन थाळीला आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने मदत दिली असून, या योजनेसाठी ५ कोटींची मदत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव मंदिर न्यास विश्वस्त मंडळाने मंजूर करून तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवल्याची माहीती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मंगळवारी दिली. ही थाळी अधिकाधिक गरजू लोकांपर्यत पोहोचावी म्हणून न्यासाने हा निर्णय घेतल्याचे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

‘शिवभोजन योजने’ला राज्यात चांगला प्रतिसाद

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानापासून सुरु झालेल्या या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या दहा रुपयांमध्ये ‘शिवभोजन योजने’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान २६ जानेवारीपासून सुरू केलेल्या या शिवभोजन थाळीकडे मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिले असून, शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत:या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे

शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जेवणाबाबत समाधानी आहात का? जेवणाची चव व्यवस्थित आहे का? काही सूचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले होते. त्यावर जेवण खुप छान आहे; गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया योजनेतील थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.

- Advertisement -

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने दान पेटीचा उपयोग हा नेहमी माणसाच्या मदतीसाठी करण्यात येतो. त्याच भावनेतून विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी योजनेसाठी ५ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  – आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक न्यास मंदिर


हेही वाचा – कोकणातील सागरी महामार्गाला लवकरच मिळणार गती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -