घरताज्या घडामोडीSindhudurg : बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलिसांसमोर हजर, दिली महत्वाची कबुली

Sindhudurg : बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलिसांसमोर हजर, दिली महत्वाची कबुली

Subscribe

सिंधूदुर्ग जिल्हा बैंक निवडणूक दरम्यान बेपत्ता झालेले बेपत्ता मतदार प्रमोद वायंगणकर अखेर समोर आले आहेत. त्यांनी पोलिस ठाण्यात हजर होत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला आहे. याआधी शिवसेनेकडून जो दावा वायंगणकर यांच्या बाबतीत केला जात होता, त्यावर मात्र अखेर पडदा पडला आहे. वायंगणकर यांनी हजर होत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळेच शिवसेनेने वायंगणकर यांच्या बाबतीत केलेला दावा फोल ठरला आहे.

वायंगणकर हजर झाल्यावर नेमकं काय म्हणाले ?

कणकवली तालुक्यातील तळेरे येथील प्रमोद महीपत वायंगणकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाले होते.शिवसेनेकडूंन वायंगणकर यांना जिल्हा बैंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार प्रमोद वायंगणकर याना कुणीतरी पळवून नेल्याचा दावा केला जात होता. आज कणकवली पोलिस ठाण्यात हजर होत वायंगणकर यांनी माझ्यावर कुणाचाही दबाव नाही,मी स्वत च कर्जाच्या नैराश्याने गेलो होतो,अशी कबुली प्रमोद वायंगणकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

याबाबतची श्री प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता झाल्या नंतर त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्यावा,अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, श्री. वायंगणकर हे आज ३ जानेवारी रोजी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहत त्यानी मी स्वतःहूनच कर्जाला कंटाळून घरातून निघून गेलो होतो अशी कबुली दिली आहे. काल रात्री ते पुण्याहून कणकवलीला यायला निघाले व आज त्यांनी कणकवलीत पोलीस स्टेशनला माहिती दिली. माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.त्यामुळे श्री वायंगणकर यांच्या बेपत्ता होण्या मागील सस्पेंस संपला आहे.


 

Sindhudurg : बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलिसांसमोर हजर, दिली महत्वाची कबुली
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -