घरमुंबईएमबीबीएसच्या वर्षाला रूग्ण-डॉक्टर संवादाला अभ्यासक्रमात महत्व

एमबीबीएसच्या वर्षाला रूग्ण-डॉक्टर संवादाला अभ्यासक्रमात महत्व

Subscribe

गेल्या काही शैक्षणिक वर्षापासून अशा प्रकारचे विषय अभ्यासक्रमात असावेत असे बोलले जात आहे. पण, यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

एमबीबीएसच्या वर्षात रुग्ण-डॉक्टर यांच्या संवादाला अभ्यासक्रमात महत्त्व दिलं जाणार आहे. मुळात डॉक्टरकीचा पेशा स्वीकारतानाच डॉक्टर म्हणजे काय? किंवा तुम्ही डॉक्टर का होत आहात? असे डॉक्टरांवरील हिंसेच्या मुळाशी हात घालणारे प्रश्न विचारतच डॉक्टरकीचे विषय शिकवण्यात येणार आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एमबीबीएस करणाऱ्या डॉक्टरांना रूग्ण आणि डॉक्टरांमधील नाते वृद्धिंगत करण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

असे असणार अभ्यासक्रमातील विषय

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला डॉक्टर म्हणजे काय ? कशासाठी डॉक्टर बनतात हा विषय राहणार आहे. तर, दुसऱ्या वर्षी डॉक्टरांची पेशातील नैतिकता, तर तिसऱ्या वर्षी रुग्णांशी कसं बोलायचे आणि चौथ्या वर्षी निष्काळजीपणा आणि मृत्यू असे विषय राहणार आहेत. डॉक्टरांवरील वाढते हल्ले यासाठी एमबीबीएसच्या वर्षात संपर्क साधणारे विषय देण्यात आले आहेत. यावर बोलताना एका तज्ज्ञ डॉक्टरने सांगितले की, ” गेल्या काही शैक्षणिक वर्षापासून अशा प्रकारचे विषय अभ्यासक्रमात असावेत असे बोलले जात आहे. पण, यावर्षीपासून याची अंमलबजावणी होईल असे दिसून येत आहे.

- Advertisement -

अभ्यासक्रमात विशिष्ट बदल

त्यासोबत डॉक्टरांवरील हल्ले आणि रूग्णांकडे होणारे दुर्लक्ष यासाठी दोन्ही बाजू तपासून पाहण्याची अत्यंत गरज आहे. या अभ्यासक्रमातून डॉक्टरांना पेशाप्रती नैतिकता शिकवण्यात येईल. डॉक्टर रुग्णांसोबत योग्य संपर्क साधत नसल्याचा आरोप रूग्णांचे नातेवाईक करतात. या सर्व मुद्यांचा विचार करता रूग्णांच्या मानसिकतेचा अभ्यास होण्यासाठी अभ्यासक्रमात विशिष्ट बदल करण्यात येत आहे.

“अतिशय स्वागतार्ह निर्णय आणि अभ्यासक्रम आहे. यातून रूग्ण आणि डॉक्टरांमधील सुसंवाद वाढेल. संवाद कौशल्य वाढल्याने बरेचसे प्रश्न सुटतील. या अभ्यासक्रमाची सुरूवात यापूर्वीच करायला हवी होती. पण, ही सुद्धा वेळ चांगली आहे.” – डॉ. सागर मुंदडा, माजी अध्यक्ष युथ विंग आयएमए

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -