घर मुंबई भारतातील पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला; उद्या होणार प्रकल्पाचा...

भारतातील पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला; उद्या होणार प्रकल्पाचा शुभारंभ

Subscribe

सिंधुदुर्ग : निसर्गाने समृद्ध असलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून आता स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना या जिल्ह्यात देश विदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. कारण या जिल्ह्यात आता भारतातील पहिलं फिश थीम पार्क (Fish Theme Park) उभारण्यात येणार आहे. उद्या (11 सप्टेंबर) या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. (Sindhudurg district has the honor of setting up Indias first fish theme park The project will be launched tomorrow)

हेही वाचा – कोपर्डी अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात घेतला गळफास

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाच्या नवलाईने नटलेला असल्यामुळे याआधीच या जिल्ह्याची महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवले जातात. यात आता फिश थीम पार्कची भर पडणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे याठिकाणी KSR Aquarium उभारण्यात आले असून उद्या सकाळी 11 वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी (9 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…

- Advertisement -

फिश थीम पार्कबद्दल माहिती देताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, कोकणात पर्यटनाला उत्तम संधी असल्यामुळे याठिकाणी पर्यटनाना जास्तीत जास्त विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. फिश थीम पार्कमध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. याचा फायदा कोकणवासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे. विशेष म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या फिश थीम पार्कचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहितीही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

फिश थीम पार्कमध्ये साडेतीन हजार विविध जातीचे मासे

या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली असून छोटेखानी तळे निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार असून गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पहावयास मिळणार आहेत, असेही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -