सायन उड्डाणपुलावरील ट्रॅफिक ब्लॉक वाढला, पूल मंगळवारी उघडणार!

sion flyover will close on may 170 bears change
सायन फ्लायओव्हर

सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १४ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या दुरुस्तीच्या कामात तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात येत आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार १७ फेब्रुवारी (सोमवारी) सकाळी ६ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव सोमवारी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार नाही. यासदर्भात रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई वाहतूक पोलिसांना कळवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीस सुरू होईल, असे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले आहे. या ट्रॅफिक ब्लॉकमुळे मुंबईकरांना या भागामध्ये वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता आणखी एक दिवस मुंबईकरांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.


वाचा सविस्तर – सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात; ८ ट्रॅफिक ब्लॉक!