घरट्रेंडिंगसायन फ्लायओव्हर आज दुपारीच खुला होणार, अभियंत्यांनी युद्धपातळीवर वेळेआधीच पुर्ण केले काम

सायन फ्लायओव्हर आज दुपारीच खुला होणार, अभियंत्यांनी युद्धपातळीवर वेळेआधीच पुर्ण केले काम

Subscribe

सायन फ्लायओव्हर आज दुपारीच वाहतुकीसाठी खुला होणार

गुरूवार २७ फ्रेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजल्यापासून बंद झालेला सायन फ्लायओव्हर आज दुपारी २ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबईतील वाहनचालकांची विकेंडला गैरसोय होऊ नये म्हणून युद्धपातळीवर काम करत हे काम पुर्ण केले आहे. गुरूवारी सायंकाळपासून बंद झालेल्या सायन फ्लायओव्हरमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी अतिशय युद्धपातळीवर काम करत विक्रमी वेळेत हे ब्लॉकचे काम पुर्ण केले आहे. सायन उड्डाणपूल हा मुंबई शहर ते मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे या भागांना जोडणारा एकमेव पूल आहे. रस्ते वाहतुकीकरीता म्हणूनच हा महत्वाचा असा फ्लायओव्हर आहे.

Sion flyover bearing replacement
फ्लायओव्हरला हायड्रॉलिक जॅक लावून तो लिफ्ट करतात, मग फ्लायओव्हर खालची बेअरींग बदलण्यात येते

 

- Advertisement -

याआधी पहिल्या ब्लॉकमध्ये १४ फेब्रुवारीला सुरू झालेले काम लांबल्याने एक अतिरिक्त दिवस ब्लॉकचा वाढला होता. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याद दिवशी मुंबईकरांना मोठ्या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण दुसऱ्या ब्लॉकमध्ये आधीचा अनुभव कामी आल्यानेच विक्रमी वेळेत ३२ बेअरींग बदलण्यात एमएमआरडीसीच्या अभियंत्यांना यश आले. दोन रात्रींमध्ये या ३२ बेअरींग युद्धपातळीवर काम करून बदलण्यात आल्या आहेत. अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्या संपुर्ण टीमने सलग दोन दिवस – रात्र घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. त्यामुळे मुंबईकरांना शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस आता या फ्लायओव्हरवरून वाहतुक करणे शक्य होणार आहे.

गुरूवारपासून झालेल्या कामात दुसऱ्या टप्यात ३२ बेअरिंग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आज दुपारी २ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

- Advertisement -

सन 1999 मध्ये सायन उड्डाणपुलाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले. शहर व उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. सन 2017 मध्ये सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालानुसार उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -