घरट्रेंडिंगचना जोर गरम, बाईकवर लिफ्टची सोय, सायन फ्लायओव्हरमुळे होणार संपुर्ण विकेंडला ट्रॅफिक

चना जोर गरम, बाईकवर लिफ्टची सोय, सायन फ्लायओव्हरमुळे होणार संपुर्ण विकेंडला ट्रॅफिक

Subscribe

२७ फेब्रुवारी सायंकाळी सुरू झालेला ब्लॉक हा २ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे.

तुम्ही मुंबईच्या दिशेने निघत असाल तर तुम्हाला आज वाहतुक कोंडीत काही वेळ नक्कीच काही वेळ घालवावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या प्रवासासाठी आगाऊ वेळेचे नियोजन तुम्हाला करावे लागणार आहे. तुम्ही वाहतुक कोंडीत अडकणार तर नाही नाही याची खबरदारी घ्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सायन फ्लायओव्हरचे काम सुरू करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी सायंकाळी सुरू झालेला ब्लॉक हा २ मार्चला सकाळपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे संपुर्ण विकेंडपर्यंत मुंबईकरांना ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागेल. चना जोर गरम म्हणत सायन फ्लायओव्हरमुळे मंदावलेल्या पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुक कोंडीमध्ये आता फेरीवालेही फिरू लागले आहेत. काल सायंकाळपासूनच फ्लायओव्हरचे काम सुरू झाल्याने वाहतुक कोंडीला सुरूवात झाली आहे.

बेस्टचे वेळापत्रक कोलमडले

मुंबईतला पूर्व द्रुतगती मार्गावर सायन फ्लायओव्हरच्या दुरूस्तीच्या कामामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर काल सायंकाळपासूनच वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. ही वाहतुक कोंडी इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की आता या वाहतुक कोंडीदरम्यान चणे शेंगदाणे घेऊन फेरीवाले रस्त्यावर उतरले आहेत. या कामामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात मंदावले असून आगामी काही काही दिवस मुंबईकरांना या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे बेस्टच्याही संपुर्ण वाहतुकीवर परिणाम होतानाच बेस्टचेही वेळापत्रक मोठ्या प्रमाणात कोलमडले आहे. सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा दुसरा टप्पा काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंबईकरांची या ट्रॅफिर ब्लॉकमुळे गैरसोय झाल्याने काही नेटकरांनी नाराजीही व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती आधी जाहीर करायला होती असे नेटकरांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले आहे. याआधीच्या ट्रॅफिक ब्लॉकमध्येही नेटकरांनी सायन फ्लायओव्हरच्या कामाच्या दुरूस्तीमुळे ट्विटरवर आपले मत मांडत वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. गेल्या ट्रॅफिक ब्लॉकच्या वेळी काही तरूणांनी बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बाईकवर परीक्षा केंद्रावर सोडून मदत केली होती.

- Advertisement -

 

- Advertisement -

सायन फ्लायओव्हरचे काम लवकर पुर्ण करा – आशिष शेलार

सायन फ्लायओव्हरचे काम लवकर पुर्ण व्हावे आणि हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनीही केली आहे. त्यांनी फ्लायओव्हर खुला करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित करून केली आहे. त्यावर युद्धपातळीवर सध्या काम सुरू असून लवकरच फ्लायओव्हर हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

अस सुरू आहे सायन फ्लायओव्हरचे काम

पहिल्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये उड्डाणपूलाचे ३२ बेअरिंग बदलण्यात आले. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर केले असून त्यातील पहिला ब्लॉक १४ फेब्रुवारीला सकाळी ५.०० ते १८ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजेपर्यंत होता. मुंबई शहरात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर होत आहे. याकारणाने, महामंडळाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी 300 मेट्रिक टन क्षमता असलेले जादा जॅक मागवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष बेअरिंग बदलण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरु आहे. बेअरिंग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलीस करणार आहेत. त्याचबरोबरीने वाहतूक पोलिसांना मदतीसाठी महामंडळाने 30 ट्रॉफिक वॉर्डन देखील दिले आहे.

ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक

27 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 2 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
5 मार्च रात्री 10.00 वा. ते 9 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
12 मार्च रात्री 10.00 वा. ते 16 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
19 मार्च रात्री 10.00 वा. ते 23 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
26 मार्च रात्री 10.00 वा. ते 30 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
2 एप्रिल रात्री 10.00 वा. ते 6 एप्रिल सकाळी 6.00 वाजेपर्यंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -