घरमुंबईसायन उड्डाणपूल एप्रिलपर्यंत राहणार बंद

सायन उड्डाणपूल एप्रिलपर्यंत राहणार बंद

Subscribe

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या डिसेंबरमध्ये हाती घेण्यात येणार असल्याने हा उड्डाणपुल एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या डिसेंबरमध्ये हाती घेण्यात येणार असल्याने हा सायन उड्डाणपूल येत्या नवीन वर्षाच्या एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. या कामाचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. मात्र हा उड्डाणपूल पूर्व उपनगरातून वांद्रे, धारावी तसेच दक्षिण मुंबईत जाणारा मुख्य रस्ता असल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

पूल दुरुस्तीला ५ कोटी खर्च येणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन उड्डाणपुलाच्या खांबांचे बेअरिंग आणि जोडणीतील सांधे बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी हा पूल पाच महिने बंद ठेवण्यात येणार आहे. हा पूल दुरुस्तीसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार असून या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे एक किलोमीटरचा सायन उड्डाणपूल २००० मध्ये खुला करण्यात आला होता.

- Advertisement -

वाहतूक कोंडीची शक्यता

या सायन उड्डाणपुलावरुन दररोज ५० हजार वाहने ये – जा करत असतात. पूर्व उपनगरातून वांद्रे, धारावी तसेच दक्षिण मुंबईत जाणारा मुख्य रस्ता असल्याने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या कामासाठी अजून वाहतूक पोलिसांची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

मुंबई आयआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वर्षभरापूर्वी पुलाचे बेरिंग, सांधे बदलण्याची आणि किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार एप्रिलमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागवल्या होत्या. त्याप्रमाणा कंत्राटदाराची नियुक्ती झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे. हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या –

वाचा – माटुंगा रोड स्थानकाचा पादचारी पूल तोडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -