Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सीताराम कुंटे यांच्यावर गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी!

सीताराम कुंटे यांच्यावर गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी!

ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये समतोल साधण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

मुख्य सचिव पदापासून वंचित राहावे लागल्यामुळे काहीसे नाराज असलेले सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव व मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याचे प्रधान सचिव श्रीनिवास यांनाही गृहनिर्माण खात्याचे प्रधान सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

सीताराम कुंटे हे यापूर्वी मुंबई महापालिकेत सह आयुक्त, अतिरिक्त पालिका आयुक्त तसेच तसेच पालिका आयुक्त म्हणूनही यापूर्वी कार्यरत होते. मुंबई महापालिकेतील प्रदीर्घ सेवेचा अनुभव असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध यापूर्वी आलेला आहे. आज मुख्य सचिव पदी नियुक्त झालेले संजय कुमार हे येत्या फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी त्यावेळी सीताराम कुंटे अथवा प्रवीण परदेशी यांची वर्णी लागू शकते. मात्र परदेशी यांच्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिक्का असल्यामुळे सीताराम कुंटे यांचे पारडे त्यावेळी जड असेल असे सनदी अधिकाऱ्यांना मध्ये बोलले जात आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे माहिती व तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास यांच्यावरही माहिती तंत्रज्ञान खात्याच्या जबाबदारी बरोबरच महत्त्वाच्या गृहनिर्माण खात्याच्या प्रधान सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीनिवास यांनीही यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त तसेच एमएमआरडी मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.


हे ही वाचा – कांबळेंच्या मृत्यूचं कारण काय? त्यांची कोरोना टेस्ट का नाही- किरीट सोमैया


- Advertisement -

 

- Advertisement -