घरमुंबईगजबजणारे अंधेरी स्टेशन आज मात्र शांत

गजबजणारे अंधेरी स्टेशन आज मात्र शांत

Subscribe

आज सकाळी अंधेरी येथील गोखले पुल कोसळला. या दुर्घटनेनंतर वेस्टन रेल्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गेल्या १४ तासापासून अंधेरीवरुन विरारकडे एकही लोकल धावली नाही. या दुर्घटनेनंतर अंधेरी स्टेशनवर शुकशुकाट पहायला मिळाला.

अरे भाई जलदी चल ना…विरार ट्रेन छुट जायेगी…असे म्हणत अनेकजण अंधेरी स्थानकात गर्दीतून वाट काढत आपली ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत असतात. मग ती सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची. अंधेरी स्टेशन म्हटले की नेहमीच वर्दळ आपल्याला पहायला मिळते. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक कंपन्या अंधेरी भागात असल्यामुळे सर्वाधिक मुंबईकर नोकरीच्या निमित्ताने अंधेरीमध्ये येत असतात. तसेच मुबंईच्या प्रमुख स्थानकापैकी एक स्थानक म्हणून अंधेरी स्थानकाची ओळख आहे. मात्र आज हेच नेहमी गजबजणारे अंधेरी स्थानक शांत शांत पहायला मिळाले. रोज अंधेरी स्थानकातील संध्याकाळ म्हणजे इथे तुफान गर्दी. मात्र आज या स्थानकातील काही प्लॅटफॉर्म तर एकमदम रिकामे पहायला मिळत होते. विशेष म्हणजे रोज विरार गाडी येते. प्लॅटफॉर्मवर रोज पहायला मिळते. मात्र आज हे प्लॅटफॉर्म सुन्न असल्याचे पहायला मिळाले.

म्हणून अंधेरी स्टेशन शांत

आज सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अंधेरीच्या गोखले रोडवरील ब्रिज अचानक कोसळला. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. जवळपास १४ तासानंतरही वेस्टन मार्गावर एकही लोकल धावत नाहीये. पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांनी आज घरीच रहाणे पसंत केले.

- Advertisement -

प्लॅटफॉर्मवरील दुकानदारानाही बसला फटका

पश्चिम रेल्वेच्या ठप्प झालेल्या वाहतुकीचा फटका जसा चाकरमान्यांना बसला तसाच फटका प्लॅटफॉर्मवरील दुकानाना देखील बसला. रोज ३ ते ४ हजारचा धंदा करणारे दुकादारांना आज कमी पैशात समाधान मानावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -