घरCORONA UPDATEपवईत एकाच दिवशी सहा कोरोनाबाधित

पवईत एकाच दिवशी सहा कोरोनाबाधित

Subscribe

बहुतांश नवीन रुग्ण हे पूर्वी आढळलेल्या रुग्णाच्या परिवारातील असल्याचे प्रामुख्याने समोर येत आहे. नुकतेच आयआयटी मुंबईतील रहिवाशी असलेली ४३ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते.

पवईतील फुले नगर या वस्तीत रविवारी सहा कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली होती. त्यामुळे पवईमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. बहुतांश नवीन रुग्ण हे पूर्वी आढळलेल्या रुग्णाच्या परिवारातील असल्याचे प्रामुख्याने समोर येत आहे. नुकतेच आयआयटी मुंबईतील रहिवाशी असलेली ४३ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते.

सायन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय परिचारिका म्हणून त्या कार्यरत आहेत. याच दिवशी पालिका ‘एल’ विभाग मात्र पवईतीलच एका वसाहतीत एक ४६ वर्षीय महिला सुद्धा कोरोना बाधित मिळून आली आहे. यापाठोपाठ पवईतील मिलिंदनगर म्हाडा वसाहतीत राहणारा आणि रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा २६ वर्षीय तरुणाचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी हिरानंदानी रुग्णालय जवळील वस्तीत राहणारा २२ वर्षीय तरुण सुद्धा कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मिलिंदनगर येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा शनिवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. २४ एप्रिल रोजी कोरोना बाधित मिळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील त्या सदस्य आहेत. याचवेळी मिलिंदनगर येथील म्हाडा वसाहतीत १ मे रोजी मिळून आलेल्या कोरोना बाधित तरुणाच्या घरातील २८ वर्षीय महिला, ७ वर्ष वयाची मुलगी, ५१ वर्षीय महिला आणि ३३ वर्षीय पुरुष असे ४ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील एकाला हिरानंदानी रुग्णालयात, एकाला सेव्हन हिल रुग्णालयात तर दोघांना पालिका अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

अरे तू पॉजिटीव्ह नाही… निगेटीव्ह आहेस

रविवारी पवईतील फुले नगरात एकाचवेळी ६ जण आढळलेल्या वस्तीत कोरोना अहवालाच्या विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. पालिकेच्या अधिकाऱ्याने आधी या रुग्णाला ‘चल तू पॉजिटीव्ह आहेस बॅग भर’ अस सांगत आवरायला सांगितले. भेदरलेला तो रुग्ण आवराआवर करत होता. मात्र काही वेळेतच ‘नाही तू… निगेटीव्ह आहेस नको येऊस’ अस सांगण्यात आले. आधी नाराज झालेला चेहऱ्यावर हास्य उमटले. पण त्याला होम क्वारंटाईन सुचवण्यात आले आहे.

- Advertisement -

सूर्य नगरातील एकजण पळाला

विक्रोळी सूर्य नगरमध्ये राहत असलेला बाधित असल्याचे‌ समजल्यावर संधी साधत पळून गेला. दुपारी अचानक पालिकेचे कर्मचारी त्याच्या घरी आले. तो कोरोना बाधित असल्याचे सांगतले. शेजारच्या सात आठ जणांना क्वारंटाईनसाठी नेले. मात्र बाधिताला रुग्णवाहीका नसल्याने थोड्या वेळात परतरणार होते. दरम्यान दुपारी कोण‌ नाही असे पाहत हा रुग्ण पळून गेला असल्याचे समजत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -