घरमुंबईप्रांजली भोसलेसह सहाजणांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी

प्रांजली भोसलेसह सहाजणांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी

Subscribe

मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने या टोळीने अनेकांची फसवणूक करून पळून गेले होते. प्रांजली भोसले, लक्ष्मण, राजेश आणि सहकारी महेंद्र या चौघांना गोवा आणि मुंबईतून पोलिसांनी अटक केली.

महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपींना सोमवारी पोलीस कोठडीतून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यात प्रमुख आरोपी प्रांजली भोसले, तिचा पती लक्ष्मण भोसले, दीर राजेश भोसले, महेंद्र भोसले, सहकारी सोमलिंगप्पा जगप्पा बिलकर आणि जनार्दन कोंडविलकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांची पोलिसांनी चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांच्याकडून प्रांजलीसंदर्भातील काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने या टोळीने अनेकांची फसवणूक करून पळून गेले होते. प्रांजली भोसले, लक्ष्मण, राजेश आणि सहकारी महेंद्र या चौघांना गोवा आणि मुंबईतून पोलिसांनी अटक केली. यांच्या चौकशीत मनपा सेवानिवृत्त कर्मचारी सोमलिंगप्पा आणि एअर इंडियाचा अभियंता जनार्दन यांचे नाव समोर आले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सर्वजण १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्यांना लोकल कोर्टात हजर केल्यावर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रांजली भोसले हिला भायखळा तर इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. याच गुन्ह्यात पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांची पोलिसांनी जबाब नोंदवला.

- Advertisement -

प्रांजली दीड वर्षांपासून कामावर हजर नव्हती, तिच्यावर काय कारवाई केली, तिच्याविरुद्ध अशाच इतर काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यावर काय कारवाई करण्यात आली, तिने कार्यालयातील काही कागदपत्रांचा गैरवापर केला होता, या गुन्ह्यात तिला इतर कोणी मदत केली का याबाबत ही चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले. या टोळीने आतापर्यंत अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांनी प्रॉपर्टी सेलमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -