केईएम रुग्णालयात प्लास्टर पडून ३ जण जखमी

Kem hospital
केईएम हॉस्पिटल

मुंबईच्या केईएम रुग्णालयात पुन्हा एकदा प्लास्टर कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडिऑट्रीक ओटीमध्ये काम करणारे कामगार घरी निघाले असताना, तळमजल्यावर कक्ष क्र. ४ च्या शेजारी असलेल्या लिफ्टबाहेरील प्लास्टर कोसळून तीन‌ कर्मचारी जखमी झाले. प्रशांत लाडोबा घाडीगांवकर (४०), प्रवीण आलाजी परमार(४२) आणि अनिल हरबीरसिंग हरिजन(२९) अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांना ही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, तिनही कामगारांचा सीटी स्कॅन केलेला असून २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या तिघांपैकी प्रशांत यांच्या डोक्याला ६ टाके पडले असून, हाताला जखम झाली आहे. तर प्रवीण परमार आणि अनिल हरिजन यांच्या डोक्याला मुकामार लागला आहे.

स्लॅबचा कोसळलेला भाग 


धक्कादायक: रुग्णाला दिला ‘मानव चलित’ व्हेंटिलेटर 

मलाईकाच्या या ‘फिगर’ फोटोवर, चाहते फिदा