घरदेश-विदेशSmartphone Usage : अनावश्यकपणे फोन तपासण्याची 50 टक्के भारतीयांना सवय; अहवालातून खुलासा

Smartphone Usage : अनावश्यकपणे फोन तपासण्याची 50 टक्के भारतीयांना सवय; अहवालातून खुलासा

Subscribe

नवी दिल्ली : मोबाईल फोन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. फोनला चार्जिंग नसेल किंवा नेटवर्क मिळत नसेल प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी नसल्यासारखे वाटते. मात्र एका अहवालातून असे समोर आले आहे की दोनपैकी एक (50 टक्के) भारतीय वापरकर्ता कोणतेही कारण नसताना त्यांचे स्मार्टफोनचा वापर करतो. ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) नुसार, एक सामान्य स्मार्टफोन वापरकर्ता दिवसातून 70-80 वेळा कोणतेही कारण नसताना स्मार्टफोनचा वापर करतो. (Smartphone Usage 50 percent of Indians have a habit of checking their phones unnecessarily Disclosures from the report)

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) ने तयार केलेला अहवाल हजारहून अधिक वापरकर्त्यांकडील क्लिक/स्वॅप डेटा आणि संपूर्ण भारतभर घेतलेल्या ग्राहकांच्या मुलाखतींवर आधारित आहे. अहवालात असे आढळून आले की, 45-50 टक्के ग्राहकांना एखादे कार्य कसे पूर्ण करावे याबद्दल स्पष्ट माहिती असते आणि 5-10 टक्के ग्राहकांना आंशिक स्पष्टता असते.

अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय स्मार्टफोन वापरकर्ते व्हिडिओ सामग्री (लहान फॉर्म/लाँग फॉर्म) प्रवाहित करण्यास प्राधान्य देतात. त्यांचा 50-55 टक्के वेळ स्ट्रीमिंग ॲप्स, सामाजिक संवाद (मजकूर/कॉल), खरेदी, शोध (प्रवास, नोकऱ्या, छंद इ.) आणि गेमिंगवर खर्च होतो.

- Advertisement -

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

सेंटर फॉर कस्टमर इनसाइट्स इंडियाच्या प्रमुख कनिका सांघी यांनी सांगितले की, “आमच्या संशोधनात, आम्ही पाहिले आहे की, सुमारे 50 टक्के वापरकर्त्यांना ते फोन का उचलत आहेत हे माहित नसते. वारंवार फोन वापरण्याची त्यांची सवय हे त्यामागचे कारण आहे. तर बीसीजी वरिष्ठ भागीदार आणि व्यवस्थापकीय संचालक निमिषा जैन यांनी सांगितले की, “स्मार्टफोन्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अलीकडेच मीडिया आणि इंडस्ट्री इव्हेंट्समध्ये ‘एआय ऑन डिव्हाईस’ किंवा ‘जनरल एआयद्वारे ॲप-लेस अनुभव’ यासारख्या थीमवर चर्चा होत आहे. हा त्याचा पुरावा आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -