घरताज्या घडामोडीबिसलेरीच्या गोदामात दुसऱ्यांदा शिरला भलामोठा साप; कामगारांची पळापळ

बिसलेरीच्या गोदामात दुसऱ्यांदा शिरला भलामोठा साप; कामगारांची पळापळ

Subscribe

भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत. गेल्या तीन महिन्यात संर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडल्याचे समोर आले असतानाच शनिवारी कल्याणातील एका बिसलेरीच्या गोदामातून आठ फूटाचा साप शिरल्याचा प्रकार घडला. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी जेल रोडवरील डॉन बॉस्को स्कुलशेजारी असलेल्या बिस्लरीच्या गोदामात आठ फूटाचा मोठा साप शिरल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

विशेष म्हणजे २० डिसेंबर रोजीही या गोदामाच्या एका बॉक्समध्ये ७ फुटाचा साप आढळून आला होता. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. एका कामगाराला हा भला मोठा साप गोदामाच्या छताला असलेल्या लोखंडी ऍग्नल मध्ये शिरताना दृष्टीस पडला. त्याने इतर कामगारांना गोदामात साप शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व कामगारांनी गोदामाबाहेर पळ काढला. त्यानंतर गोदामाच्या सुरक्षारक्षकाने वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून त्यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र बोंबे घटनास्थळी येवून त्यांनी या सापाला शिताफीने पकडले. त्यानंतर कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान हा साप धामण जातीचा असून या सापाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -