घरमुंबईशपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवर खासदार संजय राऊतांचा खुलासा

शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवर खासदार संजय राऊतांचा खुलासा

Subscribe

या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र गैरहजर होते. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्यात ३६ आमदारांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र गैरहजर होते. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण आता खुद्द संजय राऊत यांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवर खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, “मी राजकीय कार्यक्रमांना शक्यतो जात नाही. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही.” यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यातील उपस्थितीबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.” दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर कोणीही नाराज नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

विरोधी पक्षाची पोकळी भरून काढावी लागेल

पत्रकारांशी संवाद साधत असताना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “विरोधक चहा-पानावर बहिष्कार टाकतात ते ठीक. पण शपथविधीवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. विरोधी पक्षाचीही जनतेशी बांधिलकी आहे. विरोधी पक्षाची जनतेशी बांधिलकी आहे. त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसू नये नाहीतर जनतेचा विरोधी पक्षावरील विश्वास उडून जाईल”. ते पुढे म्हणाले की, “जर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडू इच्छित नसेल तर विरोधी पक्षाची ही पोकळी दुसऱ्या कोणाला तरी भरुन काढावी लागेल.”

औद्योगिक बंदला शिवसेनेचा पाठिंबा

दरम्यान येत्या ८ जानेवारी रोजी देशात औद्योगिक बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. देशात बेरोजगारी वाढली असून अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -