रेशनवर मिळणार साबण, हॅंडवॉश, शाम्पू, चहा आणि कॉफी

स्वस्त धान्य दुकान म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा रेशनच्या दुकानात आता धान्याबरोबरच साबण, हँडवॉश,शाम्पू, चहा पावडर आणि कॉफीसह डिटर्जंटसही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासर्व वस्तू रेशन दुकानात विक्रीसाठी ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही परवानगी अस्थायी स्वरुपात देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने त्यात वेळोवेळी बदल करण्यात येईल असेही याबाबतच्या शासननिर्णयात सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे हा शासनादेश देण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांना पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून रेशन दुकानावर स्वस्त दरात चिकन मटनबरोबरच अंडी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार होते. पण दोन वर्ष उलटूनही त्यावर अद्याप काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम आहे.