घरमुंबईकोरोनात मृत्यू पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास 50 लाखांची मदत मंजूर; राज्यातील पहिलीच...

कोरोनात मृत्यू पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास 50 लाखांची मदत मंजूर; राज्यातील पहिलीच मदत

Subscribe

कोरोना काळात मृत्यू झालेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कंत्राटी कामगाराला मिळणारी ही पहिलीच मदत आहे.

कोरोना काळात मृत्यू झालेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कंत्राटी कामगाराला मिळणारी ही पहिलीच मदत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते कंत्राटी कामगार प्रशांत ओहोळ यांची माता आशा ओहोळ व पिता परमेश्वर ओहोळ यांना मदत मंजूर झाल्याचा आदेश देण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यात कंत्राटी आमदार यांना देण्यात आलेली ही पहिलीच मदत आहे.

( हेही वाचा:  शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं? )

- Advertisement -

जिल्हा परिषदेत सीईओ यांच्या दालनात माढा तालुक्यांतील पालवण ग्रामपंचायतीचे डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशांत ओहोळ यांच्या वारसांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा मंजुरीचा आदेश प्रशांत ओहेळ यांच्या वारसांना देताना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाच्या पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल, माढा तालुक्यातील पालवण ग्रामपंचायतीचे अतुल क्षीरसागर, माजी सरपंच परमेश्वर पाटील, आई आशा ओहोळ, वडिल परमेश्वर ओहोळ, भाऊ तेजस ओहोळ, महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकार सेवा केंद्राचे महावीर काळे उपस्थित होते.

आईला अश्रू अनावर

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुलाच्या निधनानंतर शासनाकडून 50 लाख रुपयांचा आदेश घेताना कंत्राटी कर्मचारी दिवंगत प्रशांत ओहोळ यांची आई आशा ओहोळ व वडिल परमेश्वर ओहोळ यांना अश्रू अनावर झाले. मदतीचा आदेश हातात मिळताच त्यांनी अश्रूंद्वारे आपल्या दुख:ला मोकळी वाट केली. सीईओंच्या दालनात पाठीमागील बाजूस जाऊन त्या ढसाढसा रडल्या.

- Advertisement -

( हेही वाचा माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -