घरमुंबईआता उपलब्ध होणार सौरऊर्जेवर आधारीत एसी

आता उपलब्ध होणार सौरऊर्जेवर आधारीत एसी

Subscribe

सौरऊर्जेवर आधारीत इलेक्ट्रीक बल्ब, मोबाईल चार्जर इतकेच काय कृषीपंंंपही आपण पाहिले. पण आता सौरऊर्जेवर चालणार एअर कंडिशनरही येणार आहे. खरं वाटत नाही ना! पण हे सत्य आहे. टाटा पॉवर आणि व्होल्टास या कंपन्या येत्या काळात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत (सोलार रूफ टॉपच्या मॉडेल) हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहेत.

टाटा पॉवरचे सोलार रूफ टॉप मॉडेल देशभरात १०० शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. सौरऊर्जेवर आधारीत एअर कंडिशनर याच मोहिमेचा हा भाग असेल. दिल्लीमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठीची क्षमता जवळपास २२०० मेगावॅट आहे. पण मुंबईसारख्या शहरात टोलेजंग इमारतींचा अडथळा आहे. अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतीच्या सावलीमुळे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी अडथळे येत आहेत, असे मत टाटापॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशिष खन्ना यांनी व्यक्त केले. दिल्ली शहरात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत मुंबई शहराची क्षमता ही अवघी ५९२ मेगावॉट इतकीच आहे.

- Advertisement -

टाटा पॉवर सोलार आणि व्होल्टास या कंपन्यांच्या माध्यमातून हे सौर ऊर्जेवर आधारीत एसीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा यांनी दिली. व्होल्टासशी हात मिळवणी करून टाटा सोलरपॉवर देशातील छतावरील सौरप्रकल्पाचा कार्यक्रम विस्तारण्याच्या प्रयत्नांतआहे.

ही भागीदारी ग्राहकांना अधिक फायदेशीर ठरावी यासाठी सध्याच्या टाटा पॉवरच्या ग्राहकांना व्होल्टास ५ स्टार एसी खरेदी केल्यास 50 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. येत्या २५ वर्षांत वीजबिलांत प्रचंड मोठ्या प्रमाणात घट होईल. तसेच वीज ग्राहकांना भविष्यात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. अशा पुढाकारामुळे ग्राहकांच्या वीज बिलातही बचत होईल तसेच कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -