घरमुंबईस्वर दिपावलीत रंगली सोलो जुगलबंदी

स्वर दिपावलीत रंगली सोलो जुगलबंदी

Subscribe

शिवसेना शिवाजी नगर शाखा व विभागप्रमुख सचिन गुडेकर आयोजित सूर दिपावली या कार्यक्रमामध्ये संकेत ओक यांच्या तबला व साहिल मिश्रा यांच्या जांबे यांच्या सोलो जुगलबंदीने रसिक श्रोत्यांची मने जिंकली. शिवाजीनगर म्हाडा वसाहतीमध्ये दिवाळी पहाट हा सूर दिपावली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, भाजप शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संजय सावंत, गणेश कोतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका रश्मी समीर गुडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. आयोजक सचिन गुडेकर यांनी आभार मानले.

सतीश भानुशाली, अजिता मिस्त्री यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. पंकज बनसोडे की बोर्ड, दिगंबर मानकर ढोलकी, संकेत ओक तबला, साहिल मिश्रा जांबे यांनी साथ दिली. जगदीश हाडप यांनी निवेदन केले. सूर निरागस, आली माझ्या घरी दिवाळी या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अबीर गुलाल, मन उधाण, अधीर मन झाले, तुझे गीत गाण्यासाठी, दिसते मजला सुख चित्र नवे, धुंदी कळ्यांनो , ऐन दुपारी, चिंब भिजलेले, वारा गाई गाणे, हृदयी प्रित जगते, या जन्मावर, लाजून हासणे, राधा हि बावरी , तोच चंद्रमा अशी एकाहून एक सुमधुर गाणी सादर करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -