अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांसाठी आमचा ‘हा’ मदतीचा हात!

कोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी भारतीयांनी घरी थांबून देशसेवा करण्याची गरज असतानाही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे, या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र पोलीस प्रशासनाची पुरती धांदल उडाली असून रविवारी पार पडलेल्या कर्फ्यू दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची मात्र खाण्यापिण्यापासून हाल झाले होते. यावेळी कसलीही दुकाने उघडी नसल्यामुळे आणि सकाळी लाव्करपासून कर्तव्यावर हजर राहावे लागल्यामुळे जेवणाचे हाल निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर श्यामा देवी माता ट्रस्ट आणि हाजीशाहनवाज़ खान फाउंडेशनच्या वतीने कामोठे पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

कोरोना-कोविड – १९  साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आणि रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस दल, अन्य सुरक्षा दले आणि इतर कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. पोलिस दलाच्या सुट्या सरकारने रद्द केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकांशी सतत संपर्क साधण्यात पोलिस दल व्यस्त आहेत. यामुळे पोलिस दलातील अनेक सदस्य त्यांच्या निवासस्थानावर जाण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारी पार पाडत श्यामा देवी माता ट्रस्ट आणि हाजी शाहनवाज खान फाउंडेशनच्या वतीने २३  मार्च ते ३१  मार्च २०२०  पर्यंत स्थानिक पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण पूरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आणि याची सुरुवात कामोठे पोलीस ठाण्यापासून करण्यात आला आहे.