Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘भारतातील मुली आळशी...’ म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीने मागितली माफी! म्हणाली...

‘भारतातील मुली आळशी…’ म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीने मागितली माफी! म्हणाली…

Subscribe

सोनालीने आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये तिने केलेल्या विधानावर माफी मागितली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती भारतीय मुलींना आळशी म्हणत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे सोनालीचे खूप समर्थन झाले तर दुसरीकडे तिला खूप ट्रोल देखील केले गेले. अशा परिस्थितीत सोनालीने आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये तिने केलेल्या विधानावर माफी मागितली आहे.

सोनालीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने या पोस्टमध्ये एक नोट शेअर केली आणि लिहिले, ‘डियर ऑल, मला मिळालेल्या फीडबॅकने मी भारावून गेले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छिते. मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे इतर महिलांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी नेहमीच व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी का होईना पण वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.”

- Advertisement -

‘माझ्या क्षमतेनुसार मी केवळ स्त्रियांशीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. जर नकळत माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझ्या अंतःकरणापासून माफी मागू इच्छितो. मला खळबळजनक घटनांचे केंद्र बनायचे नाही. मी एक कट्टर आशावादी व्यक्ती आहे. माझा ठाम विश्वास आहे की, जीवन खरोखर सुंदर आहे. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’ असाही सोनालीने पोस्टमध्ये लिहिलं.

- Advertisement -

काय म्हणाली होती सोनाली कुलकर्णी?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली, “भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?”

- Advertisment -