Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन कॉन्सर्टमध्ये सेल्फीसाठी झालेली धक्काबुक्की प्रकरणात सोनू निगमची प्रतिक्रिया, म्हणाला...

कॉन्सर्टमध्ये सेल्फीसाठी झालेली धक्काबुक्की प्रकरणात सोनू निगमची प्रतिक्रिया, म्हणाला…

Subscribe

याप्रकरणी सोनू निगमच्या तक्रारीवरून उद्धव ठाकरे गटातील शिवसेना आमदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतंच गायक सोनू निगमने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी रात्री मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगमवर हल्ला झाला. सोनू निगम परफॉर्म करून परत जात असताना काही लोकांनी सेल्फी काढायला सुरुवात केली आणि अचानक बाचाबाची झाली. तेव्हाच सोनू निगमच्या टीममधील एक व्यक्ती खाली पडला. याप्रकरणी सोनू निगमच्या तक्रारीवरून उद्धव ठाकरे गटातील शिवसेना आमदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतंच गायक सोनू निगमने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी रात्री चेंबूरमधील चेंबूर फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस होता. यामध्ये गायक सोनू निगम लाइव्ह परफॉर्म करण्यासाठी आला होता. जेव्हा सोनू निगम आपला परफॉर्मन्स सादर करून तिथून निघत असताना ठाकरे गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने आधी सोनूची मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने आधी गायकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की केली आणि नंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील फातर्पेकर असं आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणात आमदार प्रकाश फुटरपेकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गायक सोनू निगनचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सोनू या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ‘कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत असताना स्वप्नील नावाच्या व्यक्तीने मला पकडले. मला सेल्फीसाठी विचारणा करण्यात आली. मी नाही म्हटल्यावर समोरच्यानं मला पकडले. ज्यानं पकडले तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील होता. त्यानंतर मला वाचविण्यासाठी माझे सहकारी हरि प्रसाद मध्ये आले. त्यानं हरि यांना देखील धक्का दिला. त्यानंतर त्यानं मलाही धक्का दिला. मला वाचविण्यासाठी रब्बानी मध्ये पडले. त्यांनाही धक्का देण्यात आला. ते गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

यापुढे बोलताना सोनू म्हणाला की, ” लोक जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा आणि हाणामारी करण्याचा विचार करू नये म्हणून मी तक्रार दाखल केली आहे. तिथे काही लोखंडी रॉड पडले असते तर रब्बानी यांचा मृत्यू झाला असता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी देखील पडणार होतो.”, असं सोनू निगम या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो.

माध्यमाशी संवाद साधताना सोनू निगम म्हणाला की, “धक्काबुक्की झाली बाकी काही नाही. मी आता संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आपण काय करतो, कसे वागतो, गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यायला हवी यासाठी मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तुम्हाला जबरदस्तीनं सेल्फी हवा असतो. तो कसा काय शक्य आहे, बर तो फोटो दिला नाही तर तुम्ही दादागिरी पण करता असं कसं चालेल?” हा प्रश्न सोनूनं यावेळी उपस्थित केला आहे.

- Advertisment -