घरमुंबई‘माझी Mumbai, आपली BMC’ - सोशल मीडियाकरता ६ कोटींची उधळपट्टी

‘माझी Mumbai, आपली BMC’ – सोशल मीडियाकरता ६ कोटींची उधळपट्टी

Subscribe

कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारी मुंबई महापालिका देशातील एकमेव महापालिका ठरली आहे

मुंबईकरांना महापालिकेच्या विविध विकासकामांची माहिती उपलब्ध करून देतानाच, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी विविध प्रकारची माध्यमे उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु आता ही सर्व माध्यमे महापालिकेने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात, तसेच त्यांच्यापर्यंत महापालिकेची काम पोहोचवता यावी, शिवाय लोकांच्या प्रश्नांचे निराकरण करता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व विभागांसाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्यावतीने (महाआयटी)३५ जणांचे मनुष्यबळ निर्माण केले आहे. यासाठी पुढील तीन वर्षांसाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सोशल मीडियाकरता एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका ठरणार आहे.

हेही वाचा – शिवाजीपार्क स्मशानभूमीच्या अर्धवट कामांसाठी नवीन कंत्राटदार

‘माझी Mumbai,आपली BMC’

मुंबई महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणार्‍या पायाभूत सेवा सुविधा तसेच विविध विकास प्रकल्प आदींबाबत लोकांना तक्रार करता यावी म्हणून नागरिकांच्या निवारणासाठी तक्रार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेने एमसीजीएसएम २४ बाय ७ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. याबरोबरच महापालिकेने www.portal.mcgm.gov.in वेब पोर्टर विकसित केले आहे. परंतु आता त्याच धर्तीवर महापालिकेने महापालिकेच्या सर्व विभागांसाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे ठरवले आहे. महापालिकेसाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म हा प्रत्येक विभागासाठी महापालिका खाते बनवण्यात येईल. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य ट्विटर हँडलचे नामकरण ‘माझी Mumbai,आपली BMC’ असे करण्यात आले आहे. तर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ट्विटर हँडल बनवण्यात आले. शिवाय प्रमुख खात्यांचेही खाते बनवण्यात आले. याद्वारे विविध विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट्स आणि कार्यक्रम नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियासाठी पालिकेची अशी तयारी

फेसबूक आणि ट्विटर इत्यांदीचा वापर हा विविध विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट्स आणि कार्यक्रम नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सोशल मीडिया प्लॅटफार्म तयार करण्यात आला आहे. विविध नागरी सेवांच्या कार्यप्रणालीचे वेगवेगळ्या टप्प्यांवर विश्लेषण करणे आणि सेवेची गुणवत्ता सुधरवण्यासाठी नागरिकांकडून अभिप्राय गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान सल्लागार मेसर्स केपीएमजी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व महाआयटी यांच्या मार्फत ३५ आयटी ऑफीस सहायक व सोशल मीडिया तज्ज्ञ आदी मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी २७ जून २०१९मध्ये करार केला आहे. १६ जुलै २०१९ ते १५ जुलै २०२२ पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाणार आहे. यासाठी महाआयटी ५ कोटी ७९ लाख ९४ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबईत कुठे आहे प्लास्टिक बंदी?

आयटी ऑफीस सहायकांची संख्या

सात विभागीय कार्यालयांसाठी – २१
आपत्ती व्यवस्थापन विभाग – ०३
जनसंपर्क विभाग – ०१
रस्ते विभाग – ०१
उद्यान विभाग – ०१
पूल विभाग – ०१
आरोग्य विभाग – ०१
घनकचरा विभाग – ०१

- Advertisement -

सोशल मीडियावरील पावणे सहा कोटींचा खर्च हा केवळ निव्वळ लुटमारीचा धंदा आहे. महापालिकेत कोणताही अधिकारी आल्यानंतर तो आपल्या मर्जीतील संस्था आणि कंपनीला कसे काम मिळेल? याचा विचार करत असतो. त्यामुळे सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर सहा कोटींचा खर्च करणेही असाच प्रयोग आहे. त्यामुळे याला आमचा तीव्र विरोध राहिल. करदात्यांच्या पैसा लुटण्याचा प्रयत्न कुणाही अधिकार्‍याने हाती तिजोरी आहे म्हणून करू नये.
रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

राज्य सरकारच्या नियमानुसार त्यांचे मनुष्यबळ घेतले जात असून फेसबूक आणि ट्विटरवर महापालिकेच्यावतीने जनजागृती तसेच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचे विश्लेषण करणे आदींची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही टिम आपत्कालिन व्यवस्थापनाच्या टिमसोबत काम करणार आहे.
शरद उघडे, प्रभारी सहायक आयुक्त, माहिती व तंत्रज्ञान विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -