घरमुंबईबिहार विधान परिषदेच्या सभापतींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधान

बिहार विधान परिषदेच्या सभापतींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधान

Subscribe

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काल त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाशिवाय मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या सुरु असणाऱ्या भेटीगाठीही राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. आज एक विशेष पाहुण्याने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली.

बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचे स्वागत केले. राज यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर भूमीपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरुन उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या परप्रांतियांना विरोध केला होता. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपाचे उत्तर प्रदेश खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचे अधोरेखित करण्यासाठी ठाकूर यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

कोण आहेत ठाकूर –

बिहार विधान परिषदेच्या सभापतीपदी नुकतीच निवड झालेले देवेशचंद्र ठाकूर हे अस्खलित मराठी बोलतात. त्यांचे अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य होते. तसेच पुणे आणि नाशिकमध्ये शिक्षण झाले आहे. ठाकूर मूळचे बिहारी असले तरी त्यांच्यावर मराठीचा पगडा आहे.

- Advertisement -

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ठाकूर यांचा होता दबदबा –

राज्याच्या राजकारणात पद भूषविण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून बिहारमधून निवडणूक लढविली पण त्यात त्यांचा पराभव झाला. विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रालयात देवेश ठाकूर यांचा  दबदबा होता. राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच मंत्रालयात ठाकूर हे विलासरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -