Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई राज्यातील रस्ते उभारणीसाठी २७८० कोटींचा विशेष निधी

राज्यातील रस्ते उभारणीसाठी २७८० कोटींचा विशेष निधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Related Story

- Advertisement -

राज्यातील रस्ते बांधणासाठी २७८० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रयी रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या निधीमुळे राज्यातील रस्तेविकासाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि कोकणच्या महामार्गांचा समावेश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.

गडकरी यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. गडकरी यांनी कोणते रस्ते करण्यात येणार आहेत, याचे अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये कोकण विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. नितीन गडकरी यांनी ‘प्रगतीका हायवे’ या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 166 इ वरील गुहार – चिपळूणला जोडणार्‍या रस्त्याचे काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले. तरेरे-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग 166जी वरील रस्त्याच्या कामासाठी 167 कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. तर गडचिरोली तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 353सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग 752 आय वरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी 228 कोटी रुपये तर तिरोरा ते गोंदिया दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तिरोरा गोंदिया दरम्यानच्या राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असेल. आमगाव गोंदिया दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी तर राष्ट्रीय महामार्ग 361 एफ च्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -