घरमुंबईमध्य रेल्वेच्या कोल्हापूर, मुंबई,नागपूरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या, जाणून घ्या गाड्यांचे विशेष वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या कोल्हापूर, मुंबई,नागपूरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या, जाणून घ्या गाड्यांचे विशेष वेळापत्रक

Subscribe

केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते धनबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवणार आहे. तसेच मुंबई व आग्रा छावणी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. तर नागपूर आणि मडगाव दरम्यान संपूर्णत: वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते धनबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी 01045 विशेष दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दर शुक्रवारी ०४.३५ वाजता सुटेल आणि धनबाद येथे तिसऱ्या दिवशी ०८.३५ वाजता पोहोचेल. 01046 विशेष दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत धनबाद येथून दर सोमवारी १०.२० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे तिसर्‍या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते धनबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्यांचे थांबे मिरज, कवठे महांकाळ, ढलगाव, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हजुर साहिब नांदेड, किनवट, आदिलाबाद, वणी, माजरी, सेवाग्राम, नागपूर, आमला, बेतूल, घोरडोंगरी, इटारसी , जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑनसोन , अनुग्रह नारायण रोड, गया, कोडरमा, पारसनाथ या ठिकाणी असणार आहेत. एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, तीन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 5 द्वितीय श्रेणी आसन अशाप्रकारे संरचना करण्यात आली आहे. 01045 विशेष गाडीसाठी आरक्षण सामान्य भाडे दराने सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर दिनांक 16 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होईल.

- Advertisement -

मुंबई- आग्रा कॅन्टोन्मेंट साप्ताहिक विशेष गाडी 02161 विशेष दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी १६.२५ वाजता सुटेल आणि आग्रा कॅन्टोन्मेंट येथे दुसर्‍या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल. 02162 विशेष दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आग्रा कॅन्टोन्मेंट येथून दर शनिवारी १९.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, हरदा, तिमर्णी, इटारसी, हबीबगंज, बीना, झांसी, डबरा, ग्वालियर, मुरैना येथे असतील. एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, चार वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 3 द्वितीय श्रेणी आसन अशी संरचना असणार आहे.

मुंबई – हबीबगंज साप्ताहिक विशेष रेल्वे 02153 विशेष १८ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस दर गुरुवारी १६.२५ वाजता सुटेल आणि हबीबगंज येथे दुसर्‍या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
02154 विशेष १९ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हबीबगंज येथून दर शुक्रवारी १८.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे ठाणे, कल्याण, भुसावळ, खंडवा, हरदा (केवळ 02154 साठी), इटारसी, होशंगाबाद असे असतील. एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, चार वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 3 द्वितीय श्रेणी आसन संरचना असणार आहे. आरक्षण पूर्णपणे आरक्षित 02161 आणि 02153 विशेष गाड्यांसाठी आरक्षण सामान्य भाडे दराने दिनांक 16 फेब्रुवारी 2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडतील.

- Advertisement -

नागपूर आणि मडगाव दरम्यान पूर्णत: वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या 01237 वातानुकूलित साप्ताहिक विशेष २०फेब्रुवारी २०२१ ते २७ मार्च २०२१ पर्यंत दर शनिवारी नागपूरहून १५.५० वाजता सुटेल आणि मडगावला दुसर्‍या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. 01238 वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी २१ फेब्रुवारी २०२१ ते २८ मार्च २०२१ पर्यंत मडगाव येथून दर रविवारी १९.४० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी २०.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीचे थांबे वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे असणार आहेत. १३ तृतीय वातानुकूलित श्रेणी अशी गाडीची संरचना असणार आहे. ट्रेन क्र. 01237/01238 या पूर्णतः आरक्षित वातानुकूलित विशेषचे १० दिवसांच्या अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (एआरपी) सह विशेष शुल्क आकारून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर १७ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होईल.

उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळावरुन किंवा किंवा एनटीईएस अ‍ॅपवरुनही तुम्ही ही माहिती मिळवू शकता. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


हेही वाचा – सावधान: बँकेत नोकरीच्या शोधात आहात का? मग हे नक्की वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -