घरमुंबईमोठी बातमी - दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार

मोठी बातमी – दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार

Subscribe

दहावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी (ता. 02 मे) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे लागून राहिले आहे. नुकत्याच महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी (ता. 02 मे) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा – यंदाही १२ वीच्या निकालात मुलीच अव्वल; ९५.३५ टक्के मुली उतीर्ण

- Advertisement -

2 जूनला दुपारी 01 वाजता जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org आणि http://ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

तर इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या http://mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा. यावर क्लिक करताच SSC Examination February- 2023 RESULT अशी लिंक दाखवण्यात येईल. यावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाकण्यासाठी पर्याय असतील. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकताच निकाल स्क्रिनवर दाखवण्यात येईल. हा निकालाची प्रिंट देखील विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये 2 ते 25 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली असल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -