घरताज्या घडामोडीदेशातील ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मुंबईचा डंका

देशातील ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मुंबईचा डंका

Subscribe

देशातील पहिल्या १० स्वायत्त कॉलेजमध्ये मुंबईतील तीन कॉलेजचा समावेश झाला असून पहिल्या १०० मध्ये मुंबईतील तब्बल १८ कॉलेज आहेत. तर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज हे देशातून पहिले तर मिठीबाई कॉलेज हे देशातील पाचवे कॉलेज ठरले आहे.

सध्या देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना सर्वत्रच भीतीचे वातावरण पसरले आहे. पण, यामध्येही मुंबईसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे देशातील पहिल्या १० स्वायत्त कॉलेजमध्ये मुंबईतील तीन कॉलेजचा समावेश झाला असून पहिल्या १०० मध्ये मुंबईतील तब्बल १८ कॉलेज आहेत. तर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज हे देशातून पहिले तर मिठीबाई कॉलेज हे देशातील पाचवे कॉलेज ठरले आहे.

सेंट झेवियर्स कॉलेजने पटकावला अव्वल क्रमांक

एज्युकेशन वर्ल्ड इंडिया प्रायव्हेट या शैक्षणिक संस्थेकडून देशातील स्वायत्त कॉलेजची पाहणी करून त्यांचा दर्जा ठरवण्याचे काम करत आहे. २०२०-२१ साठी एज्युकेशन वर्ल्ड इंडिया प्रायव्हेट देशातील सुमारे २५० कॉलेजची पाहणी केली. शिक्षकांची गुणवत्ता, कॉलेजमधील अभ्यासक्रम आणि शिक्षण, नोकरीच्या संधी पायाभूत सुविधा, नेतृत्त्व आणि प्रशासनाच्या कामाचा दर्जा, विद्यार्थी कल्याण आणि विकास या बाबींच्या आधारे स्वायत्त कॉलेजची गुणवत्ता ठरवण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजने ७०० पैकी ६३० गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

पहिल्या १० मध्ये मुंबईतील ३ कॉलेजचा समावेश

तर त्याखालोखाल बंगळुरूचे सेंट जोसेफ कॉलेज (६२१), चेन्नईतील मद्रास ख्रिश्चन कॉलेज (६१६) असे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मिठीबाई कॉलेज आणि माटुंगामधील आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स यांनी ५९७ गुणांसह पाचव क्रमांक पटकावला आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षी झेवियर्स कॉलेज चौथ्या क्रमांकावर होते. यावर्षी कॉलेजने विविध उपक्रम राबवत आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल करत २०२० मध्ये अव्वल कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे मिठीबाई कॉलेजची कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरते. २०१८ मध्ये १८ व्या क्रमांकावर असलेल्या मिठीबाई कॉलेजने २०१९ मध्ये नवव्या क्रमांकावर झेप घेतली. शिक्षण क्षेत्रातील आपली ही आघाडी मिठीबाई कॉलेजने कायमी ठेवत २०२० मध्ये थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मिठीबाई कॉलेजप्रमाणे मुंबईतील आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सचा दोन वर्षातील आलेख हा प्रचंड चढा आहे. २०१८ मध्ये पहिल्या ५० कॉलेजांच्या यादीत नसलेल्या पोदार कॉलेजने (८१ वा क्रमांक) २०१९ मध्ये जोरदार मुसंडी मारत १७ वा क्रमांक पटकावला. ही आघाडी कायम ठेवत पोदार कॉलेजने २०२० मध्ये थेट पहिल्या पाचामध्ये स्थान मिळवले आहे.

मिठीबाई कॉलेजच्या यशाचे श्रेय श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे दूरदर्शी व्यवस्थापन, अनुभवी प्राध्यापक, कर्मचारी आणि गुणी विद्यार्थी यांचे आहे. हे यश म्हणजे कॉलेज नेतृत्वाने योजनाबद्ध रीतीने आखलेली शैक्षणिक व आर्थिक व सांस्कृतिक रूपरेषा व त्यानुसार योजलेली कार्यपद्धती ह्याचा परिपाक आहे. प्रशासनात, अध्यापनात, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शिक्षण, अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख केले आहेत. स्वायत्ततेमुळे ही प्रगती शक्य झाले. – डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले, मुंबई

- Advertisement -

महाराष्ट्रातील टॉप ५ कॉलेज

कॉलेज गुण
सेंट झेवियर्स ६३०
मिठीबाई कॉलेज ५९७
आर. ए. पोदार कॉलेज ५९७
एच आर कॉलेज ५४०
के. जे. सोमय्या कॉलेज ५३३


हेही वाचा – पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -