घरताज्या घडामोडीभाभा रुग्णालयाच्या वाढीव रकमेचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

भाभा रुग्णालयाच्या वाढीव रकमेचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

Subscribe

काळ्या यादीतील कंत्राटदार म्हणून वांद्य्रातील भाभा रुणालयाच्या स्थायी समितीने फेटाळलेला प्रस्ताव सप्टेंबर २०१९मध्ये मंजूर करण्यात आला. मात्र, चुकीचे गणन केल्यामुळेच ही वाढ झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीने करत हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवला आहे.

काळ्या यादीतील कंत्राटदार म्हणून वांद्य्रातील भाभा रुणालयाच्या स्थायी समितीने फेटाळलेला प्रस्ताव सप्टेंबर २०१९मध्ये मंजूर करण्यात आला. मात्र, प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या कामांची किंमत १४ कोटी रुपयांनी वाढली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राट कामांच्या प्रस्तावात चुकीचे गणन केल्यामुळेच ही वाढ झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीने करत हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवला.

२८७ कोटी रुपये खर्च करून रुग्णालयाची इमारत उभारली

वांद्रे पश्चिम येथील महाापालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून पूर्वी असलेल्या तळमजली इमारतीचे बांधकाम पाडून त्याठिकाणी बहुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय अस्तित्वात असलेल्या बहुमजली इमारतीची दुरुस्ती करून त्याचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. २८७ कोटी रुपये खर्च करून रुग्णालय इमारत उभारली जाणार आहे. यासाठी क्वॉलिटी हाईटकॉन प्रायव्हेट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या रुग्णालय इमारतीचे आराखडे आणि संरचनात्मक नकाशे बनवण्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून स्कायलाईन आर्किटेक्ट्स यांची नेमणूक केलेली आहे.

- Advertisement -

१४ कोटी रुपयांचा खर्च वाढला

सध्याच्या तळ मजल्याच्या तोडण्यात येणाऱ्या जागेवर दोन तळघर तसेच तळ मजला आणि त्यावर १२ मजल्यांचे बांधकाम  करत ४९७ खाटांचे प्रशस्त, असे हे रुग्णालय उभारले जाणार आहे.  या रुग्णालय इमारतीचे आराखडे आणि संरचनात्मक नकाशे बनवण्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून स्कायलाईन आर्किटेक्ट्स यांची नेमणूक केलेली आहे. या सल्लागाराला ३६ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी १० टक्क्यांऐवजी १५ टक्के एवढी करण्यात आल्याने तसेच त्यावरील विविध कर यामुळे १४ कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी मंजूरीला आला असता, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी आयुक्तांकडे पाठवण्याची मागणी उपसुचनेद्वारे केली. १० टक्क्यांवर १५ टक्के शुल्क देण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत झाला आहे, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच या स्कायलाईन आर्किटेक्ट्स यांची नेमणूक करताना स्थायी समितीची मान्यता घेतली होती का? याची गणना चुकली तर लेखा विभाग काय करत होता. त्यामुळे सर्वांची उत्तरे देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवला

काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरिया यांनीही याला पाठिंबा देत २०१७ मध्ये सल्लागाराची निवड करण्यात आली. एप्रिल २०१९ मध्ये या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे प्रस्तावात या फेरफारच्या रकमेची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. तर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या कामाचा प्रस्ताव मंजूर होऊनही कंत्राटदाराने कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाहिले केले. पण, वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय या इमारतीचे बांधकाम अद्याप केले नाही. त्यामुळे अशाप्रकारे कामाला विलंब करून मग कंत्राटदार आणि सल्लागार आपले शुल्क वाढवून घेतात. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा वांद्रे भाभा रुग्णालयाचा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवून दिला.

- Advertisement -

हेही वाचा – रणजितसिंह डिसलेंना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्याही आले होते संपर्कात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -